डोंबिवली : कल्याण पूर्वेतील लाल चौकी ते नेवाळी नाका ह्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकर होणार आहे.
तसेच कल्याण पूर्व येथील यू टाइप रस्त्याचे विकास काम निशित झाले आहे. या दोनही रस्त्यांना एमएमआरडीए ने मंजुरी दिली असून एकूण २०१ कोटींच्या कामाचे टेंडर निघाले आहे. या विषयाची माहिती मंगळवारी कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली. या विकास कामाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एमएमआरडीएचे त्यांनी आभार मानले आहेत.
