डोंबिवलीत प्रजासत्ताक दिन सोहळा धुमधडाक्यात

डोंबिवली : पूर्वेतील दत्तनगर चौकात दीडशे फुटी उंच ध्वज फडकवून महापालिका आयुक्‍त अभिनव गोयल यांनी ध्वजवंदन केले.
कल्याण– डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांच्यासह नगरसेवक हर्षल मोरे, माजी पदाधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि डोंबिवलीकरांनी तिरंग्याला सलामी देत संविधानाच्या मूल्यांना नमन करण्यात आले आणि सशक्त, समृद्ध भारत घडवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
या राष्ट्रीय उत्सवाला सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग तसेच स्थानिक नागरिक कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात देशाभिमान, एकता आणि उत्साहाचे चित्र दिसून आले.नाका कामगारांचा महाराष्ट्र जनरल मजदूर संघटने तर्फे प्रजासत्ताक दिन सोहळा:महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या तर्फे प्रजासत्ताक दिन सोहळा नाका कामगारांच्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख आमदार राजेश मोरे, सुहास हेमाडे (सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली), गणेश जवादवाड (डोंबिवली वरिष्ठ पोलिस निरीक्षक), राम चोपडे (विष्णुनगर वरिष्ठ पोलिस निरीक्षक), राजेंद्र अहिरे (मानपाडा वरिष्ठ पोलिस निरीक्षक), चंद्रकांत ठाकरे (मानपाडा पोलिस निरीक्षक) यांनी ध्वजवंदन केले. यावेळी मिसाळ यांनी महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून नाका कामगारांच्या कुटुंबियांसाठी सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच कामगारांना या योजनांमुळे फायदा झाल्याच्या अनेक घटना सर्वांसमोर मांडल्या. त्यांच्या या कार्याचे आमदार मोरे यांनी कौतुक केले. कामगारांनी एकसंघ राहिल्याचा फायदा होतो असेही सांगितले. सर्वांना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माणिक उघडे, दादाभाऊ अभंग, बाळासाहेब आरोटे, मीनाताई कांबळे, रेखाताई कांबळे, अक्षदा भोसल, भगवान भुजंग, भुजंगराव कांबळे, दीपक भालेराव, सुरेंद्र ठोके यांनी ध्वजवंदन कार्यक्रमात सहभाग घेतला.तसेच पश्चिमेकडील सम्राट चौक जवळील ओमकार साई बालसंगोपन केंद्र येथे प्रजासत्ताक दिनानिमित झेंडावंदन केले. यावेळी संस्थापक सुविधा दांडेकर, महाव्यवस्थापक अनिकेत हिंदळेकर व अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुलांना खाऊ वाटण्यात आला.साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात प्रजासत्ताक दिन :पश्चिमेकडील कुंभारखानपाडा येथे साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात प्रजासत्ताक दिन निमित्ताने झेंडावंदन करण्यात आले. संस्थापक अध्यक्षा सुमेधा थत्ते यांच्या तर्फे साधना वृद्ध सेवा केंद्रात प्रत्येक सण-उत्सव सह राष्ट्रीय सण साजरे केले जातात.या अशा विविध कार्यक्रमामुळे वृद्ध आपले दुःख, अडचण विसरून जातात. वृद्धाश्रम म्हणजे एक कुटुंब म्हणून आजी-आजोबांसाठी दहीहंडी उत्सव, तुलसीविवाह, गणेशोत्सव, रक्षाबंधन, दिवाळी, होळी, रंगपंचमी अशा सणांबरावर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन व २५ जानेवारी प्रजासत्ताक दीन हे राष्ट्रीय सण साजरे करतो. कारण आजी आजोबांना त्यांच्या वैयक्तिक दुःखांपासून मुक्ती मिळते अशी आमची भावना आहे असे सुमेधा थत्ते यांनी यावेळी सांगितले.