(महापौर पदासाठी नगरसेविका हर्षाली चौधरी थवील व उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांची उमेदवारी)
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन या निवडणुकीत एकूण १२२ नगरसेवक निवडून आले. आता महापौर व उपमहापौर पदासाठी तीन फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपा आणि मनसे यांची महायुती असून महापौर पदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका हर्षाली चौधरी थवील व उपमहापौर पदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे या दोघांनी अर्ज दाखल केले आहेत.

महापालिका सचिव कार्यालयात महापौर व उपमहापौर पदाचा अर्ज दाखल करताना यावेळी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकुमार (नंदू) परब, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील, नगरसेवक दीपेश म्हात्रे, रमेश सुकऱ्या म्हात्रे तसेच महापौर पदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका हर्षाली चौधरी व उपमहापौर पदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक संदर्भात महायुतीचे उमेदवार सौ. हर्षाली चौधरी थवील व राहुल दामले हे शिवसेना व भाजपचे दोन्ही विजयी नगरसेवक आहेत त्यांनी महापौर व उपमहापौर असे उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खास करून मनसेचे राजू पाटील, राज ठाकरे यांचे देखील खूप खूप धन्यवाद त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एक मोठी ताकद कल्याण डोंबिवलीत झाली आहे. शिवसेना भाजपा मध्ये आता मनसेची भर पडली आहे. येणाऱ्या तीन तारखेला महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार हे बिनविरोध निवडून येतील असा पूर्ण विश्वास आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेही धन्यवाद. आता एमएमआरडीए परिक्षेत्रात सगळीकडे महायुतीचे महापौर उपमहापौर येणार हे दिसून येईल. लाडक्या बहिणीनी महायुतीला पाठिंबा दिला. आता त्याच लाडक्या बहिणींचा सन्मान महायुतीतील सर्वांनी केला आहे. आमची लाडकी बहिण येणाऱ्या काळात महापिलीकेचा कारभार पाहणार आहे.
चौकट : यापूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. ही मोठी हानी आहे. ही महाराष्ट्र व देशाची हानी आहे. एक मोठं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेल आहे. ही मोठी पोकळी कधी करून न येणार अशीच आहे. आपण कधीही विचार केला नव्हता अशी परिस्थिती येईल. अजितदादा आपल्याला सोडून गेले हे दुःख प्रत्येक महाराष्ट्राच्या मनात आहे. नेहमी प्रशासनावर पकड, शिस्तप्रिय अशी दादांची ओळख आहे. आपण सर्वजण त्यांच्या परिवारांच्या दुःखात सहभागी आहोत.
