डोंबिवलीतील आयरे गावातील पाटील कुटुंबाचा आगळा वेगळा सोहळा !

डोंबिवली : सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक हे तीन शब्द वेगवेगळ्या क्षेत्रांना सूचित करतात. परंतु ते एकमेकांशी जोडलेले आहेत. तसेच ते एकमेकांवर प्रभाव पाडतात. सामाजिक पैलू समाजाशी संबंधित आहे. शैक्षणिक पैलू शिक्षणाशी संबंधित आहे. तर सांस्कृतिक पैलू विशिष्ट गट किंवा समुदायाच्या रीतिरिवाज, परंपरा आणि श्रद्धांशी संबंधित आहे. असाच तिन्ही क्षेत्रातील एक मिलाप जुळून आला आहे तो डोंबिवलीतील आयरे गावातील पाटील कुटुंबियांमध्ये. डोंबिवलीतील आयरे गावातील हे पाटील घराणे मुख्यतः ओळखले जाते ते म्हणजे महंत भागवताचार्य ह.भ.प. बाळकृष महाराज यांच्यामुळेच.

ह.भ.प. बाळकृष महाराज यांनी भागवत कथेद्वारे सत्य, अहिंसा, प्रेम आणि सेवा यासारखे धार्मिक आणि सामाजिक संदेश ज्याप्रमाणे जनमानसाला दिले तशीच तंतोतंत शिकवण त्यांच्या कुटुंबातील तरुण-तरुणींनाही मिळाल्याचे त्यांच्या घरातील मुलांकडे पाहिल्यावर दिसून येत आहे. कारण पाटील कुटुंबातील सर्वच मुले विविध क्षेत्रात आपलं वेगळेपण टिकवून ठेवण्यात यशस्वी झाली आहेत. याचे कारण म्हणजे ह.भ.प. बाळकृष महाराज यांच्या बंधूंनी ओढलेली महाराजांची री आज पुढेही तशीच चालू आहे.नुकताच ह.भ.प. बाळकृष्ण महाराज यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांतील उच्च शिक्षित मुलांचा सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी जय अंबिका भक्त मंडळ आयरेचे अध्यक्ष तथा उद्योजक विजय पाटील यांच्यासह सर्व पाटील मंडळी उपस्थित होती. तेव्हा प्रत्येकाची शैक्षणिक माहिती खुद्द बाळकृष महाराज यांच्याच बंधूंनी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील निवृत्त सहायक आयुक्त मनोहर सुदाम पाटील (बीकॉम, एल.एस.जी.डी., एल.जी.एस.) यांनी दिली.डोंबिवली आयरे गावातील एकाच पाटील कुटुंबातील अश्विनी शिवाजी पाटील (सीएस (कंपनी सचिव)), चिन्मय तानाजी पाटील (कमर्शियल पायलट), सर्वेश सागर पाटील (कॉम्प्युटर इंजिनिअर डिप्लोमा), स्नेहल भूषण लोखंडे (एम.कॉम, एल.एल.बी.), श्रेया संतोष पाटील (बी.एम.एम), स्वेता अंकित पाटील (बीएचएमएस), अदित्य शिवाजी पाटील – बी.एम.एस. (प्रवास आणि पर्यटन), स्वप्निल मनोहर पाटील (एमबीए), रोशन मनोहर पाटील (वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स नॅशनल टेक्निकल) अधिकृत, रिया रोशन पाटील (वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स नॅशनल, टेक्निकल ऑफिशल), पूजा स्वप्नील पाटील (एमबीए) या सर्वांचा कौटुंबिक कौतुक सोहळा नुकताच करण्यात आला. याचे औचित्य म्हणजे यापुढील पिढीला आपल्या घराण्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याची माहिती होऊन त्यांनी पुढेही ही प्रथा सुरू ठेवावी असे यावेळी ह.भ.प. बाळकृष महाराज यांनी सांगितले. एकूणच कार्यक्रमाला एक वेगळे पण अनोखे स्वरूप दिसून आले.