डोंबिवलीकर भजन भवन नवीन वास्तूचे थाटामाटात लोकार्पण

डोंबिवली : डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रम म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानक फलाटावर भजन कार्यक्रम होतो. आम्हाला छोटी जागा द्यावी अशी मागणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदार तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. यानुसार चव्हाण यांनी छोटी जागा नाही प्रशस्त निसर्गाच्या सानिध्यात सुसज्ज असे भजन भुवन उभारले. याच डोंबिवलीकर भजन भवन नवीन वास्तूचे लोकरण थाटामाटात भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते धूमधडाक्यात रविवारी करण्यात आले.

डोंबिवलीकर भजन भवन हे गणेश विसर्जन घाट, गणेशनगर, डोंबिवली (प.) येथे खडी किनारी निसर्गाच्या सानिध्यात उभारण्यात आले असून भजन भवनाचे शिल्पकार आमदार रवींद्र चव्हाण आहेत. भजन हा आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक प्रमुख घटक आहे. डोंबिवली शहरालाही भजनाची परंपरा लाभली आहे. ही परंपरा जोपासणे हे आपले कर्तव्य आहे. या कर्तव्यभावनेतून डोंबिवली पश्चिम येथील गणेश घाट येथे ‘डोंबिवलीकर भजन भवन’ उभारण्यात आले आहे. आमदार विकास निधीच्या माध्यमातून डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्थेच्या मागणीनुसार्व ही वस्तू उभारण्यात आली आहे.

डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्थेच्या या नवीन वास्तूचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीकरांशी स्नेहसंवाद केला. तसेच डोंबिवली पश्चिम येथील युवा गायक राजयोग धुरी यांचा सत्कार करण्यात आला.

या लोकार्पण सोहळ्यात आमदार चव्हाण यांचा संस्थेच्या माध्यमातून यथोचित यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना संत परंपरेला धरून तंबोरा, चिपळ्या, पुष्पगुच्छ आणि पगडी घालून मोठ्या प्रेम भावनेने आदरातिथ्य करण्यात आले तेव्हा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.

सदर लोकार्पण सोहळ्यासाठी लोकरे बुवा, शहाबाजकर बुवा, प्रमोद धुरी बुवा, मुणगेकर बुवा, बुवा, भाई राणे बुवा, सतीश राणे बुवा यांच्यासह भाजपा कल्याण चिले बुवा, जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक राहुल दामले, माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, माजी नगरसेवक नंदू म्हात्रे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, राहुल म्हात्रे, नंदू जोशी, रेखाताई म्हात्रे तसेच मोठ्या संख्येने डोंबिवलीकर उपस्थित होते.