कबुतरांच्या विष्ठेमुळे हायपर सेन्सेटिव्हटी न्यूमोनायटिस आजार होण्याची शक्यता !
चेस फिजिशियन डॉ. दीप्ती बडवे – कुलकर्णी प्रतिपादन
डोंबिवली : आपल्या घराच्या गॅलरीत किंवा रस्त्यावरील चौकात पक्षाना दाणा पाणी देताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण
कबुतरांच्या विष्ठेमुळे हायपर सेन्सेटिव्हटी न्यूमोनायटिस आजार होण्याची शक्यता असते. घरातील पाळीव पक्षी – प्राण्यांचे लसीकरण केलेले असते तर निसर्गात वावरणाऱ्या पक्षांसाठी ते शक्य नसते. पक्ष्यांची कितीही काळजी असली तरी प्रथम आपले आरोग्य जपणे हे अत्यंत महहत्वाचे आहे. त्यासाठी काही बंधने असणे गरजेचे आहे. शहरात कबुतरांची संख्या वाढत आहे. खरंतर कबुतर खाना असे प्रकार लोकवस्ती बाहेर असावेत असे वक्तव्य डॉ. दीप्ती बडवे – कुलकर्णी यांनी डोंबिवलीत केले.

मुंबईतील लीलावती रुग्णालय व डोंबिवलीतील ओजस रुग्णालयातील चेस फिजिशियन डॉ. दीप्ती बडवे – कुलकर्णी यांच्याशी डोंबिवली पत्रकार संघाचा वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्यांनी हायपर सेन्सेटिव्हटी न्यूमोनायटिस आजार विषयी विस्तृत माहिती दिली.
कबूतरांची विष्ठा व गळालेले पिसे यामुळे मानवी आरोग्याला धोका’ या गंभीर विषयावर डोंबिवली पत्रकार संघाने एक परिसंवाद डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगर पोस्ट ऑफिसजवळील ओजस हॉस्पिटल येथे आयोजित केला होता. यावेळी संघांचे अध्यक्ष शंकर जाधव व सचिव प्रशांत जोशी यांनी उपस्थिती पत्रकारांना डॉ. दीप्ती बडवे – कुलकर्णी यांची ओळख करून दिली.
यावेळी डॉ. दीप्ती बडवे म्हणाल्या, कबुतरांची विष्ठा व गळलेली पिसे यामुळे मानवाच्या फुफ्फुसचे आजार होतात. कबुतरांना दाणा पाणी देताना मानवी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण पाहतो की कबुतरांची संख्या वाढत आहे. कबुतरे आपल्या परिसरात येत असतात. कबुतरे टोलेजंग इमारतीजवळ वास्तव करतात. येथेच अंडी घालतात व विष्ठा करतात. विष्ठा व गळलेली पिसे ही मानवी आरोग्याला धातक आहेत. कबूतरांची विष्ठा इतकी सूक्ष्म असते की ते तिचा थेट मानवी श्वसनावर परिणाम होतो. कबुतरांच्या संपर्कात असलेल्यांना दम लागणे, खोकला व ताप येणे ही लक्षण दिसल्यास त्यांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. इतकेच नव्हे तर यामुळे ‘हायपर सेन्सेटिव्हटी न्यूमोनायटिस’ आजार होऊ शकतो. कबूतरांना दाणा टाकणे हे आधी थांबविले पाहिजे. आपल्या घराच्या बाल्कनीत जाळी लावावी जेणेकरून कबुतर आत येणार नाहीत. वार्तालापच्या शेवटी सदस्य सोनल सावंत-पवार यांनी आभार मानले.
कबूरतरांची विष्ठा अत्यंत ऍसिडिटी असून त्यातील घातक केमिकल्स हवेतून जलद प्रसार होतो. परिणामी घशाचे रोग, श्वसनाचा त्रास, दम्याचा अटॅक व रोगप्रतिकारक शक्तीसाठी घातक असते.