डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रभाग क्रमांक 64 कैलास नगर येथील भाजपा पश्चिम मंडल उपाध्याय डॉ. सर्वेश शाहू सावंत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनुसार कैलास नगर, डोंबिवली पश्चिम येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचा लाभ ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांनी घेतला.
कैलास नगर, डोंबिवली पश्चिम येथील डॉ. सर्वेश सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे शिबिर रविवारी घेण्यात आले होते. या शिबिरात डॉ. सर्वेश सावंत यांनी स्वतः ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. या शिबिराला मंडल अध्यक्ष पवन पाटील, सरचिटणीस समीर सुर्वे, सरचिटणीस हर्षद सुर्वे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेश भोईर, प्रभाग क्र. ६४ अध्यक्ष अमोल मराठे आदी भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली. सदर आरोग्य शिबिरात हिमोग्लोबिन तपासणी, बी. पी. तपासणी, रक्तातील साखर तपासणी, नेत्र तपासणी, प्राथमिक तपासणी तसेच मुखाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर आदी तपासण्या घेण्यात आल्या.
यावेळी डॉ. सर्वेश सावंत म्हणाले, पावसाळी हंगामात साथीच्या रोगांची दाट शक्यता असते. यामध्ये सर्दी, ताप, खोकला याचे प्रमाण जास्त असते. मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याबाबत जास्त जागरूक राहिले पाहिजे. वेळच्यावेळी आरोग्य तपासण्या केल्या तर औषोधपचार करणे सुलभ होते. या शिबिरातून ज्यांना कोणत्याही अधिक रुग्णसेवेची आवश्यकता असल्यास त्यांना सेवा दिली जाईल परिणामी आरोग्य चांगले राहील. तसेच विभागात काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी येत आहेत. त्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने काही सुधारणा करण्याचे कामे सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात या समस्या मार्गी लागतील.
सदर आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी कैलास पवार, तुषार नाईक, प्रशांत कुलकर्णी, गणेश.ह. निंबाळकर, सुशील गाव, संतोष म्हात्र, अरुण सांगत, दयानंद पवार, नितिन सांवल, भूषण सनम, अशोक मोरे यांनी विशेष मेहनत घेतली. तर डोंबिवली शास्त्रीनगर आरोग्य केंद्रातील कमलाकर पवार, सुवर्णा अंभोटे, कल्याणी मैंगे, स्वाती उजवे, सजुला कमोजिया, रिकेश कसबे, प्रियांका चौधरी यांनी काम पाहिले