( जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये निवड )
डोंबिवली : डोंबिवली जवळील सांगाव मधील मंदार सतीश म्हात्रे याने 17 मे रोजी गोंदिया येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तीन सुवर्णपदक व क्लासिक पॉवरलिफ्टिंग सुवर्णपदक, बेंचप्रेस स्पर्धेत सुवर्णपदक व डेडलिफ्ट स्पर्धेत सुवर्णपदक पटकविले आहेत. 31 जुलै ते 3 ऑगस्ट मध्ये छत्तीशगड मधील विलासपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकविले आहे. नोव्हेंबर महिन्यात आसाम राज्यात होणाऱ्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मंदारची निवड झाली आहे. मंदारचे काका सचिन म्हात्रे यांनी मंदारचे अभिनंदन केले आहे.
पॉवरलिफ्टिंग हा एक सामर्थ्यवान खेळ आहे यामध्ये तीन लिफ्ट्स – स्क्वॅट, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट यांचा समावेश असतो. या खेळात, खेळाडू जास्तीत जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न करतात. पॉवरलिफ्टिंगमध्ये, खेळाडूंना प्रत्येक लिफ्टसाठी तीन संधी मिळतात आणि ते विजेते ठरतात जे सर्वात जास्त वजन उचलतात ते यशस्वी ठरतात हाच उद्देश डोळ्यासमोर होता असे मंदार म्हात्रे याने सांगितले.