डोंबिवली : पूर्वेकडील शिवमंदीर रोडवर डॉ. संतोष गोरे ( चेंजफिजिशियन ), डॉ. प्रतीक भुजबळ ( ऑर्थोपेडीक ) आणि डॉ. शालवी भुजबळ ( वर्टीगो स्पेशालिस्ट ) यांचे अँपल पॉलीक्लिनिकचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी अनेक राजकीय मंडळींसह इतर डॉक्टर उपस्थित होते.
आमदार राजेश मोरे यांनी अँपल पॉलीक्लिनिकचे कौतुक करत रुग्णावर उपचार आणि त्याची सेवा करणारे हे पॉलीक्लिनिक असल्याचे यावेळी सांगितले..तर डॉ. गोरे यांनी आपल्या पॉलीक्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णावर उपचार करून त्याना बरे करणे हाच आमचा उद्देश आहे असे सांगितले. दरम्यान डॉ. शालवी भुजबळ यांनी अँपल पॉलीक्लिनिक विषयी आणि आरोग्य सुविधेबाबत बोलताना सांगितले की, मुख्य म्हणजे रुग्णाला चक्कर येत असेल त्यासाठी न्यूरोलॉजिस्ट किंवा ईएनटी तज्ञ (कान, नाक आणि घसा तज्ञ) यांचा सल्ला घ्यावा. काही वेळा हवामानातील बदल, विशेषतः वातावरणाच्या दाबातील बदलांमुळे चक्कर येऊ शकते असेही डॉक्टर शालवी भुजबळ यांनी मत व्यक्त केले.