डोंबिवली : जिजामाता जयंती निमित्त डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब यांच्या माध्यमातून महिला सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन केले. सदर उपक्रमात ग्रामीण तसेच शहरी महिलांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. विशेष म्हणजे दुचाकी वाहन चालक परवानासाठी सुशिक्षित महिला भगिनीं मोठ्या संख्येने गर्दी केली.
गणपती मंदिर, सुदामानगर, एमआयडीसी डोंबिवली पूर्व येथील भाजपा ग्रामीण मंडळ कार्यालयात या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह अंतर्गत पहिल्या दिवशी नेत्र तपासणी करण्यात असली होती. त्यानंतर स्तनरोग तपासणी, ब्लड ग्रुप, रक्त, पॅप स्मिअर, ई. सी.जी., तपासणी तसेच अस्थिरोग तपासणी व महिला बचत गट स्थापन करणे, मोफत दुचाकी परवाना काढून देणे, ऑडॉयोलॉजी आणि स्पीचथेरपी कर्णबधिरता तपासणी, दंतरोग तपासणी आणि सरकारी योजनांची माहिती असा भरगच्च कार्यक्रम आहे. याबाबत नंदू परब म्हणाले की महिलांसाठी खास सप्ताह आयोजित असून मेळाव्यात महिलांना चालकांचे प्रशिक्षण देण्यासाठी वेगळी नियोजन करण्यात आले आहे. महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात हा या मागचा एकमेव उद्देश आहे. तसेच जानेवारीपासून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.