संस्कार भारती तर्फे भागशाळा मैदानात भव्य रांगोळी [ भाजपा मंडल उपाध्यक्ष दिनेश जाधव यांचा अनोखा उपक्रम ]

डोंबिवली : अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. प्रत्येक हिंदुनी या कार्यात योगदान द्यावे या उद्देशाने निधी संकलनाचे काम भारतभर सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपा मंडल उपाध्यक्ष दिनेश जाधव यांनी भागशाळा मैदान येथे संस्कार भारतीच्या रांगोळी कलाकारांच्या सहकार्याने भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. नयनरम्य रांगोळी पाहण्यासाठी पाहण्यासाठी डोंबिवलीकर गर्दी करीत आहेत.

निधी संकलन कार्याची माहिती सर्वदूर व्हावी या उद्देश्याने दिनेश जाधव यांनी रांगोळी उपक्रम हाती घेतला. संस्कार भारतीचे रांगोळी कलाकार उमेश पांचाळ आणि इतर सहकारी यांनी ही भव्य रांगोळी आठ तासांच्या प्रयत्नांनी रेखाटली आहे. श्री राममंदिर जनजगृती हा या संकल्पनेचा उद्देश असल्याचे यावेळी जाधव यांनी सांगितले. रांगोळी साकारण्यासाठी दहा संस्कार भारतीच्या दहा रांगोळी कलाकारांनी मेहनत घेतली आहे. रांगोळीसाठी तीस किलो सफेद रांगोळी आणि वीस किलो रंगाचा वापर करण्यात आला आहे. पंचवीस बाय पंचवीस फुट चौरस रांगोळी काढण्यात आली असे उमेश पांचाळ यांनी सांगितले.

पश्चिम विभागातील भागशाळा मैदानात श्रीराम मंदिर निधी संकलन जनजागृतीसाठी साकारलेली रांगोळी पाहण्यासाठी आमदार रविद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी भाजपचे दिनेश जाधव, कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रज्ञेश प्रभूघाटे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि डोंबिवलीकर उपस्थित होते.

यावेळी चव्हाण यांनी सांगितले कि, अयोध्यामध्ये श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण झालं पाहिजे असं प्रत्येक हिंदूंच्या मनामधील भावना होती. आपल्या सर्वांची श्रीराम मंदिराबद्दलची प्रतीक्षा पूर्णत्वाच्या दिशेनं जाण्यासाठी सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं भूमिपूजन केले आहे. मंदिर निर्माण कामामध्ये प्रत्येकाचं योगदान असलं पाहिजे. गरिबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणसाने आपल्याला जे शक्य आहे तो निधी दिला पाहिजे. यासाठी 15 जानेवारी पासून एक महिना निधी संकलानाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. सर्व कार्यकर्ते, सर्व ठिकाणचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने प्रत्येकजण निधी संकलनाच्या कामाला हातभार लावणार आहेत. या विभागातील नागरिकांना विनंती आहे कि आपण सर्वांनी स्वेच्छेने श्रीरामाच्या भव्य मंदिरासाठी आपल्याला जो निधी देणे शक्य आहे तो द्यावा. राष्ट्राच्या उभारणीसाठी भव्य मंदिरला योगदान देणे महत्वाच आहे.