श्रीसत्यनारायण महापूजा व साई भंडारा

डोंबिवली : श्रावण महिन्यातील पुण्यपवित्र गुरुवारी,
दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी आयोजित महापूजा व भव्य साई भंडारा मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात जुनी डोंबिवली येथे पार पडला. प्रभागातील नागरिक, मान्यवर, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी होते. यावेळी पाहुण्याचे शाल,श्रीफळ व तुळशीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल उपाध्यक्ष कृष्णा पाटील व महिला मोर्चा पदाधिकारी रसिका कृष्णा पाटील यांनी त्यांच्या जुनी डोंबिवली रिक्षा स्टँड जवळील जनसंपर्क कार्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे श्रीसत्यनारायण महापुजेचे आयोजन केले होते. यावेळी साईभंडारा आयोजित केला होता. दरम्यान स्थानिक भजन मंडळ माध्यमातून सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला. साईभंडाऱ्यात सुमारे ३००० हून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्तिभावाने हा कार्यक्रम यशस्वी झाला, सर्व उपस्थितांचे मन:पूर्वक आभार. येथील नागरिकांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे समाजासाठी नवनवीन उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळते असे यावेळी कृष्णा पाटील यांनी सांगितले.