माजी आमदार नरेंद्र पवारही होणार सहभागी
( दिलेली मुदत उलटूनही पोलीस प्रशासनाकडून कारवाई न झाल्याचा आरोप )
डोंबिवली : कल्याण पश्चिमेच्या चिकणघर येथील टायकून अवंती ग्रुप एल एल पी त्यांचे विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीच्या पुनर्विकासाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही यावर चर्चा होऊन सभासदांना न्याय देण्याचे आश्वस्त केले आहे. मात्र शांतिदूत सोसायटी मार्फत टायकून अवंती ग्रुप एल एल पी त्यांचे विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ यांच्या विरोधात पोलिस प्रशासनाकडे सादर केलेल्या तक्रारीची मुदत उलटूनही स्थानिक पोलीस प्रशासन संबंधित टायकून अवंती ग्रुप एल एल पी त्यांचे विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ या विकासकांवर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे सांगत इथल्या सभासदांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. येत्या रविवार ३ ऑगस्टपासून हे सर्व रहिवासी आपापल्या कुटुंबीयांसोबत आमरण उपोषण सुरू करत असून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार हेदेखील त्यामध्ये सहभागी होणार आहेत.
कल्याण पश्चिमेच्या चिकनघर येथील शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीचे सभासद गेल्या 14 वर्षांपासून आपली हक्काची घरे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पुनर्विकासाचे काम घेतलेल्या संबंधित टायकून अवंती ग्रुप एल एल पी त्यांचे विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ विकासकाकडून झालेल्या अन्यायकारी विलंबामुळे इथल्या शेकडो कुटुंबांवर अक्षरशः देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. यासाठी ही सर्व कुटुंब गेल्या 14 वर्षांपासून कायदेशीर लढा देत असून अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. या शेकडो रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार हेदेखील सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
तर नुकत्याच झालेल्या १६ जुलै रोजी महात्मा फुले पोलीस ठाण्यात शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीचे सभासद आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत संबंधित टायकून अवंती ग्रुप एल एल पी त्यांचे विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ या विकासकांवर 10 दिवसांत कारवाईचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले होते. मात्र दहा दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे सभासदांकडून सांगण्यात आले. तर 25 जुलै रोजी पुन्हा एकदा शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीचे सभासद आणि त्यावेळी टायकून अवंती ग्रुप एल एल पी चे विकासक चेतन सराफ व श्री गणेश शितोळे आणि महात्मा फुले पोलिस प्रशासन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पोलिसांनी कारवाई न केल्याबद्दल एक शब्दही न काढता उलटपक्षी 1 महिन्याची मुदत वाढ मागितल्याची धक्कादायक माहितीही सभासदांनी दिली. तसेच पोलिसांकडून सभासदांना कशाला आंदोलन करता? कशाला विरोध करता, विकासकाला मदत करा असा दबावही पोलिसांकडून टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. आणि टायकून अवंती ग्रुप एल एल पी त्यांचे विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ च्या विरोधात प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक निर्णय अद्याप पर्यंत घेतला जातं नही. या शेकडो रहिवाशी यांनी दाद तरी नक्की कोणाकडे मागायची हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर टायकून अवंती ग्रुप एल एल पी त्यांचे विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्याच्या मागणीसाठी येत्या रविवारी ३ ऑगस्टपासून शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीचे सर्व 184 सभासद आपल्या कुटुंबीय आणि विक्री गटाचे रहिवासी यांच्यासह आमरण उपोषणाला बसणार आहेत. ज्यामध्ये कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व रहिवाशांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत लढा देऊ असा ठाम निर्धार माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.