डोंबिवली : पश्चिमकडील श्रीगणेश भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जाधववाडीच्या महाराजाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले. ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया जयजयकार करीत गणेश भक्तांनी जल्लोष केला. मंडळाचे अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या शिस्तप्रिय मार्गदर्शनामुळे कोणालाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला नाही.
बापाच्या पाद्यपूजन सोहळ्यापासूनच मंडळाच्या कार्यकर्त्यांना बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले होते. दरवर्षीप्रमाणे सजावटीसाठी मुबलक वेळ मिळावा म्हणून पंधरा दिवस अगोदर बाप्पाचे आगमन झाले. श्री साईराज मित्र मंडळ माध्यमातून डोंबिवली पश्चिम महात्मा फुले रोड येथील जाधववाडी प्रवेशद्वार परिसरात मंडळ गणेशोत्सव साजरा करतात.
यंदाचे मंडळाचे ३४ वे वर्ष आहे. काल मंगळवारी हॉटेल द्वारका येथून बाप्पाच्या आगमनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावर्षी गजानन ढोल पथक आणि डोंबिवली बिट्स हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. श्री साईराज मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश रमेश जाधव यांनी त्यांच्या कुटुंबासमवेत बाप्पाला पुष्पहार अर्पण करताच गणपती बाप्पा मोरया म्हणत ढोल पथकातील कार्यकर्त्यांनी ढोल वादनाची जुगलबंदी सादर केली. भगवा फडकताना सर्वांच्या नजरा ध्वजाकडे आकर्षित झाल्या. सर्व गणेशभक्त आपल्या मोबाईलमध्ये बापाचा फोटो काढण्यात तल्लीन झाले होते.
संध्याकाळी साडेसात वाजता सुरू झालेली बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक दोन तासानंतर गणेशोत्सव उत्सव ठिकाणी पोहचली. आगमन मिरवणूक यशस्वी होण्यासाठी गणेश गणेश जाधव, महेश जाधव, राज जाधव, प्रशांत बुलबुले, मयूर कांदळगावकर, यज्ञेश ढोले, राहुल मस्के, सौरभ संकेत, स्वप्निल आपटे, सुधीर शेख, हिमांशू जाधव, यश जाधव, अनिश मालप, गजानन चिटणीस, प्रणित भांबुर्डे ,अनिश मालक, गट्टू जाधव, अमोल करकरे, देवेंद्र गोरे आदी पदाधिकारी व गणेश भक्त उपस्थित होते.