भोपर गावातील अंधेरी पुलाचे कामाचे भूमिपूजन

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने भोपर अंधेरी पूल नवीन बांधण्यासाठी माजी नगरसेविका रविना अमर माळी यांच्या पाठपुराव्यामुळे पालिकेकडून १,६५,८४,९४२ रु निधी मंजूर झाला. रविवारी १२ ऑक्टोंबर रोजी भोपर अंधेरी नवीन पुलाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.यावेळी माजी नगरसेविका रविना माळी, अमर माळी, संदीप माळी, कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब, दत्ता माळेकर यासह पदाधिकारी, कार्यकर्ते पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि भोपर गावचे सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. यावेळी संदीप माळी यांनी उपस्थित ग्रामस्थ मंडळींना हा पूल लवकरात लवकर बनले असे सांगितले.