डोंबिवली : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून नावलौकिक असणाऱ्या डोंबिवली शहरात सुमारे चार ते पाच लाख लोक मनोरुग्ण असण्याची शक्यता मानसोपचार तज्ञ डॉक्टर विजय चिंचोले यांनी वर्तविली. १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दीन म्हणून ओळखला जातो. यामुळे मानसिक आजार या विषयी त्याबद्दलची मते जाणून घेण्यासाठी डॉक्टर चिंचोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मानसिक आजाराबद्दल असणारे गैरसमज आणि दुर्लक्ष दूर करणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.

मानसिक रोगाने त्रस्त असलेलेबरेचसे लोकं डॉक्टरकडे जातच नाहीत ते सहन करत राहतात कारण गैरसमज. तसंच या विषयी डॉक्टरला दाखवायचं हेच मिळत माहिती नसत. बरेच लोक ज्योतिषी तसेच भगातांकडे जातात. विशेष म्हणजे या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांच प्रमाण 15 ते 20 टक्क्यापर्यंत असेल. परंतु या आजाराचा सर्वे झालेला नाही.
मनोविकार पेक्षा मनोविकास मेंटल हेल्थ त्याच्यावरती आपण फोकस करायला पाहिजे. मेंटल फोकस कसा करणार तर सगळ्यात मुख्य कारण काय या गोष्टींचा तणाव तणाव, नियोजन याच शिक्षण सुरुवातीपासूनच अगदी लहान मुलांपासून म्हणजे शाळेपासून शिकवलं पाहिजे. आपणही स्वतः ते आत्मसात केलं पाहिजे.
डॉक्टर विजय चिंचोले यांनी सांगीतले की, झोप व्यवस्थित झाली पाहिजे. आता झोपेच्या सवयी चुकल्यामुळे सुद्धा मानसिक आजार होतात. झोप व्यवस्थित घेतली गेली पाहिजे. वेळच्या वेळेवर झोपला पाहिजे, वेळच्या वेळेला उठलं पाहिजे. मोबाईलचे प्रमाण प्रचंड असेल तर ते कमी करायला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण उपवास (फास्ट) करतो त्याप्रमाणे व्यस्त टेक्नॉलॉजीच्या जगात मोबाईलचं प्रमाण वाढल्याने टेक्नॉलॉजी फास्ट केला पाहिजे. म्हणजेच मोबाईलपासून एक दिवस पूर्णपणे दूर राहील पाहिजे. म्हणजे काय तर पूर्ण एक दिवस मोबाईल, लॅपटॉप टीव्ही, इंटरनेट काहीच वापरायचं नाही. लहान मुलांच्या बाबतीत त्यांनी सांगितले की, पालकांची मोठी जबाबदारी वाढली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांचे नको ते लाड पुरविले जातात. त्यामुळे मुलांच्या मेंदूला सहनशीलतेचा अभाव येतो. मुलांचा त्रासिकपणा वाढतो. परिणामी त्याचे रूपांतर प्राथमिक मनोरुग्ण फेरीत होऊ शकते. त्यामुळे मुलांच्या मागण्या पालकांनी एका झटक्यात पूर्ण करू नये असा सल्लाही त्यांनी पालकांना दिला.
