डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका विद्याताई राजेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून जाधव वाडी महाराजा गेट रस्ता, जाधव वाडी नं. १ शिवमंदिर रस्ता, बदाम गल्ली रस्ता येथील रस्ता काँक्रीटीकरण काम सुरू होत आहे. या विकासकामांचे भूमिपूजन रविवारी स्थानिक भाजपा आमदार तथा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, राजेश म्हात्रे, पश्चिम मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी, माजी नगरसेवक नंदू म्हात्रे, माजी नगरसेवक संतोष केणे, माजी नगरसेवक प्रकाश भोईर, माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस, उपाध्यक्ष दिनेश जाधव, युवा नेते अनमोल म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

