मनसे विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांचा राजीनामा

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा जिल्हाअध्यक्ष धनंजय गुरव यांच्याकडे दिला आहे. म्हात्रे भाजपात प्रवेश करण्याचे संकेत मिळत आहेत.

मनसेचे मिलिंद म्हात्रे यांनी आपल्या पदानुसार विद्यार्थ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचा व आवाज उठविण्याचे काम केले. पालिकेच्या क्रिडा स्पर्धेत स्पर्धेकांना तिथेच जागेवर मेडल दिले जात नव्हते. मात्र मिलिंद म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने आणि प्रयत्नाने या स्पर्धेतील विजेत्यांना त्याच ठिकाणी पहिल्यादाच मेडेल्स मिळाले.

मिलिंद म्हात्रे यांनी वैयक्तिक व अन्य कारणामुळे
रजिनामा देत असल्याचे त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटले असले तरी कोणत्या पक्षात जाणार याबाबत त्यांनी मौन पाळले. असे असले तरी ते इच्छुक असलेल्या पॅनेलचा विचार करता भाजपात जाणार अशी चर्चा सुरू आहे. कदाचित बुधवारी ते पक्षप्रवेश करतील असे खास सूत्राकडून समोर येत आहे.