डोंबिवली : मुंबई महानगर विकास प्राधिकरण कक्षेत असणाऱ्या शहरे व ग्रामीण भागातील नागरिकांना परवडतील अशी घरे येथील विकासकांनी निर्मिती केली आहेत. अशा दर्जेदार घरांची माहिती ‘प्रॉपर्टी एस्पो’ द्वारे मिळणार असून गृहकर्ज आणि इतर फायदे प्रथम घर खरेदी करणाऱ्या मध्यमवर्गीय नागरिकांना मिळावे हा उद्देश या ‘प्रॉपर्टी एस्पो’चा आहे अशी माहिती बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांची प्रमूख संघटना असणाऱ्या एमसीएचआय क्रेडाईच्या कल्याण डोंबिवली युनिटचे अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ इंडस्ट्री कल्याण डोंबिवली युनिटच्या कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील, राजेश गुप्ता, प्रफुल्ल शहा, मिलिंद चव्हाण, मनोज राय, श्रीकांत शितोळे, दीपक मेहता, विकास विरकर आदी विकासक सदस्य उपस्थित होते.
यावेळी पाटील पुढे म्हणाले, विकासकांची प्रमूख संघटना असणाऱ्या एमसीएचआय क्रेडाईच्या कल्याण डोंबिवली युनिटतर्फे या वर्षीही ‘प्रॉपर्टी एस्पो’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सदर प्रदर्शन कल्याण पश्चिम लाल चौकी जवळील भव्य फडके मैदानात होणार आहे. गुरूवार 24 ते 27 जानेवारी, 2018 या कालावधीत सकाळी 11 ते रात्रो 8 वेळेत होणार आहे. प्रदर्शनात विकासकांचे सुमारे 57 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांचा विचार करून या प्रदर्शनास कल्याण, डोंबिवली, आंबिवली, टिटवाळा, शहापूर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत विभागातील नागरिकांना या प्रदर्शनाचा फायदा होणार आहे.
तर प्रॉपर्टी एक्स्पो चेअरमन मिलिंद चव्हाण म्हणाले, मेट्रो ट्रेन, एम.एम.आर.डी.ए चे प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना, सिटी पार्क आदी योजना कल्याण डोंबिवलीत होत आहेत. परंतु असे असले तरी वाहतूक कोंडी समस्या सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. सध्याच्या वाहतूक कोंडीमुळे बिल्डरांचे नुकसान होत आहे. ग्राहक वाहतूक कोंडीचा विचार करतो. प्रत्येकाला स्वतःच्या मालकीचे व हक्काचे घर मिळू शकेल. चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा कल्याण डोंबिवली परिसरातील बांधकाम व्यावसायिक अग्रेसर आहेत. गेल्या वर्षीचा अनुभव बघता यावर्षी 25 हजाराहून अधिक लोक या प्रदर्शनास भेटी देतील.