केमिकल कंपन्यातील अपघात रोखण्यासाठी डोंबिवलीत मार्गदर्शनपर शिबीर

डोंबिवली : कारखान्यातील वाढत्या स्फोटच्या घटनेवर गांभीर्याने लक्ष देत कल्याण अंबरनाथ मन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि औद्योगिक आरोग्य सुरक्षा संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी डोंबिवलीतील कामा संघटनेच्या कार्यालयात रीऍक्टर सेफ्टी विषयावर मार्गदर्शनपर शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिराचा फायदा येथील केमिकल कंपनीतील सेफ्टी ऑफिसरांनी उपस्थित राहून घेतला. यावेळी या विषयातील तज्ञ डॉ. वाल्मिकी ढाकणे आणि कृष्णा यादव यांनी परिपुर्ण मार्गदर्शन केले. कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, मार्ग कमिटीचे उद्य वालावलकर, निवृत्त सेफ्टी इन्चार्ज बापजी चौधरी,घरडा केमिकलचे विकास पाटील, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय उपसंचालकएल.के.गोराने आणि एम. पी. टोटेवाड उपस्थित होते. शिबीर कामा संघटना आणि औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले होते.
दरम्यान प्रत्यक्ष उपस्थित पत्र्कारांशी बोलताना पाटील म्हणाले, `रीऍक्टर सेफ्टी` हे केमिकल कारखान्यासाठी अति मह्त्वाचा भाग बनला आहे. कारखान्यातील सेफ्टी ऑफिसर यांना यासंदर्भातील संपूर्ण माहिती मिळणे आवश्यक असल्याने यासाठी कामा संघटनेने पुढाकार घेत रीऍक्टर सेफ्टी मार्गदर्शनपर शिबीर भरविले.

काही वेळा छोटीसी चूक हे जीवघेणे होऊ शकते. यासाठी कोणती काळजी घ्यावी याची थोडक्यात माहिती दिली. तर देवेन सोनी यांनी यासंदर्भात माहिती देताना कामा संघटनेने पुढाकार घेऊन अश्या प्रकारच्या शिबिराचे आयोजन केले आहे. तसे अनेक राज्यातील अनेक शहरात भरविले गेल्यास भविष्यातील अपघात होणार नाहीत. कामा संघटनेला यासाठी विविध शहरातील असोसिएशने संपर्क केल्यास त्यांना याबाबत तज्ञांच्या माध्यमातून माहिती दिली जाईल. तर निवृत्त सेफ्टी इन्चार्ज बापजी चौधरी यांनी केमिकल कंपनीत काम करताना`सेफ्टी`हा विषय खूप महत्वाचा असतो. यासाठी कोणती काळजी घ्यावी हे अश्या प्रकारच्या शिबिरातून मिळते.