डोंबिवली : आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति पंढरपूर म्हणून शहरातील ओळख असलेल्या दत्तनगर येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांनी मनोभावे विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. ‘विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ या गजराने वारकरी संप्रदायचे भक्तगण विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले होते.
आषाढि एकादशीच्या दिवशी सर्वच भक्तांना पंढरपूरला जाणे शक्य नसल्याने डोंबिवलीकरांची गर्दी आयरे रोडवरील विठ्ठल मंदिरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. स्थानिक माजी नगरसेवक राजेश मोरे, पांडुरंग पाटील, माधव पाटील, चेतन म्हात्रे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. कोकणातील भजन मंडळचे माध्यमातून भजनाचा कार्यक्रम झाला. दर्शनासाठी येणाऱ्या विठ्ठल भक्तांना राजेश मोरे यांनी फराळाची व्यवस्था केली होती. सकाळपासून मंदिरात विठ्ठ नामाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी राजेश मोरे म्हणाले, पांडुरंगाला विनंती आहे कि सर्वांना आनंदात ठेव, सर्वांचे आरोग्य चांगले ठेव हीच प्रथांना आहे.
रेल्वे स्थानकावर आषाढी एकादशी उत्सव सोहळा :
प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी हरी ओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ दिवा-डोंबिवली व लोकसेवा समीती यांच्या तर्फे आषाढी एकादशी उत्सव सोहळा डोंबिवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर साजरा करण्यात आला.
सर्व भक्त गण विठ्ठलाच्या नामस्मरणात नाऊन निघाले. भजन, किर्तन, रिंगण करून डोंबिवली स्टेशन परिसर पंढरपूरमय झाला. या कार्यक्रमाला दरवर्षी प्रमाणे भाजपा आमदार रविंद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर, पवन पाटील बाळा परब, समीर सुर्वे यांच्यासह विठ्ठल भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.