( तीन दिवस उत्सव, दहा हजार डोंबिवलीकर होणार सहभागी ) डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रभाग क्रमांक 76 व 77 मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोरदार साजरा करण्यात येणार आहे. शिंदे समर्थक नगरसेवक राजेश मोरे आणि नगरसेविका भारती मोरे यांनी हा सोहळा आयोजित केला असून तीन दिवसांच्या या राष्ट्रीय उत्सवात सुमारे दहा हजार डोंबिवलीकर सहभागी होणार आहेत. प्रभाग विद्युत रोषणाईने झगमगणार असून राष्ट्रीय तिरंग्याला सलामी झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजीही होणार आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला 75 वर्षे होत आहेत. या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ” हर घर तिरंगा ” या उपक्रम माध्यमातून नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन मोरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक नगरसेवक राजेश मोरे व भारती मोरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
हा उत्सव तीन दिवस साजरा होणार आहे. प्रभागात विदयुत रोषणाई तसेच दत्तनगर येथील स्वातंत्र्यसेनानी स्मृती स्थळाजवळील ठाणे जिल्ह्यातील सर्वोच्च उतुंग असलेल्या 150 फुट ध्वजस्तभावरील झेंडा मान्यवरांच्या हस्ते फडकणार आज. झेंडावंदन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवांनी इथे असणार आहे. शिवाय केंद्रीय धोरणानुसार प्रभागत 5 ते 8 हजार नागरिकांना झेंडा वाटपाच्या कार्यक्रमाला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
याबाबत राजेश मोरे म्हणाले, आपल्या देशावर पूर्वी इंग्रजांनी राज्य केले त्याकाळी खूप अत्याचार झाला होता. अखेर स्वातंत्र्यसेनांनीनी उठाव केला आणि पारतंत्र्यातून मुक्तता मिळवली. यावर्षी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याने अमृत महोत्सवाच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा लावा या केंद्र सरकारच्या आदेशानुसार दत्तनगर विभागात दोन्ही प्रभागात सुमारे 5 हजार झेंड्याचे वाटप करणार आहोत. देशाभिमान म्हणून प्रत्येक जण सहभागी होत असून हा राष्ट्रीय सण साजरा करीत आहेत.