डोंबिवली : स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार “हर घर तिरंगा” हा उपक्रम साजरा होत आहे. या उपक्रमानुसार कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशन त्यांच्या प्रत्येक इंडस्ट्री आणि ऑफिसवर झेंडे फडकवणार आहेत. कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशन सदस्य यासाठी कार्यरत झाले आहेत.
या उपक्रमाबाबत कामा संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेन सोनी म्हणाले या उपक्रमासाठी आमचे काही सदस्य झेंडा वितरण कार्यात गेले परंतु त्यांना झेंडे मिळाले नाहीत. यामुळे आम्ही कापड उद्योजक यांच्याकडून कापड घेतले. त्यानंतर प्रिंटिंग करणारे उद्योजक आहेत यांच्याकडून झेंडे प्रिंटिंग करून घेतले आणि दुसऱ्या उद्योजकांकडून ते झेंडे शिवून घेतले. अशा प्रकारे आम्ही अडीच हजार झेंड्यांची निर्मिती केली. त्यानुसार आम्ही कल्याण डोंबिवली इंडस्ट्रीज क्षेत्रातील उद्योजकांना मोफत झेंडे वाटप केले. यासाठी डॉ. राजू बैलूर, डॉ. कमल कपूर, डॉ. निखिल धूत, डॉ. जयवंत सावंत, डॉ. उदय वालावलकर, डॉ आदित्य नाकर, मिलिंद केळकर, आशिष भानुशाली, सुरेंद्र पाटील, श्रीकांत जोशी यासर्वांचे सहकार्य मिळाले.