बधितांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार : दत्तनगर बीएसयुपी प्रकल्पातील नागरिकांचा १४ वर्षाचा वनवास संपला !

(राजेश मोरे यांच्या पाठपुराव्याला यश)

डोंबिवली : केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून होणाऱ्या बीएसयूपी योजनेतील डोंबिवली पुर्वेतील दत्तनगर राहिवासी आपल्या स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत होते. यासाठी लोकशाही मार्गाने, आणि पत्रव्यवहार करून शासनाकडे पाठपुरावा केला पण काळ लोटला. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामुळे त्या बधितांना बुधवारी घरांच्या चाव्या मिळणार यामुळे दत्तनगर वसाहतीत आनंदी-आनंद होता. घराच्या चाव्या मिळणार याचा आनंद आणि मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ढोल-ताशा आणि बँडच्या गजरात मिरवणुकीने कल्याणला कार्यक्रमस्थळी रवाना झाले. नगरसेवक तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सर्वांचे स्वागत केले.

बधितांना गेली १४ वर्ष डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर बीएसयूपी प्रकल्पातील सुमारे ४५० लाभार्थींच्या हक्काच्या घरासाठी ‘ बाळासाहेबांची शिवसेना ‘ डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हे शासन दरबारी पाठपुरावा करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मोरे यांनी हा विषय सामान्य नागरिकांसाठी महत्वाचे असल्याने या लाभार्थ्यांना घरे मिळवून दिली. बुधवारी रात्री कल्याण येथे विकास लोकापूर्ण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे येणार आहेत. या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दत्तनगर येथील बीएसयूपी प्रकल्पातील लाभार्थ्यांना घरांची चावी दिली जाणार आहे. यावेळी माजी नगरसेवक राजेश मोरे हेही उपस्थित राहतील. लाभार्थ्यांचा दतननगर बीएसयूपी रहिवासी संघाला घेऊन मोरे हे कल्याण निघाले. यावेळी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन लाभार्थी ढोल-ताश्याच्या गजरात डोंबिवलीतून निघाले.

यावें₹ळी राजेश मोरे म्हणाले, आज लाभार्थ्यांचा १४ वर्षाचा वनवास संपला आहे. 2008 साली बीएसयूपी प्रकल्पाची घोषणा झाली आणि 2011पासून प्रकल्प सुरू झाला. प्रकल्प सुरू झाला पण लाभार्थींना भाडे तत्वावर घर घेणे परवडत नव्हते. या लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे मिळावी याकरता मी तीन दिवस उपोषण केले. जनतेचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी प्रकल्पातील लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे मिळावी म्हणून प्रयत्न केले. आज या लाभार्थ्यांना हक्काची घरे मिळणार असल्याने यासारख्या मोठा आनंद नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घराची चावी मिळते हे आमचं भाग्य आहे. सर्व लाभार्थी जवळजवळ 850 आहेत पण 425 लोकांची घरे तोडण्यात आली होती. काही उर्वरीत लोकांना घराचं वाटप होणार आहे. आम्ही कोणाला त्रास दिला नाही, आंदोलन, उपोषण केले, मोर्चे काढले पण प्रशासन, राजकीय लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतळू होती. आम्ही सत्यासाठी भांडत राहिलो आणि आज सत्याचा विजय होत आहे.