डोंबिवली : वृद्ध महिलेवर ट्रान्सकॅथेटर आओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन (TAVI) शस्त्रक्रियेनंतर कल्याणमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कन्सल्टन्ट-इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी डॉ. विवेक महाजन व त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया पार पाडली. या शस्त्रक्रियेला मिळालेले यश हे वैद्यकीय आघाडीवर कल्याणसाठी एक महत्त्वाचे यश असल्याचे डॉ.महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारी आरोग्य योजनेत अद्याप या शस्त्रक्रिया समाविष्ट केली नाही. या उपचाराचा खर्च खूप असतो.त्यामुळे सरकारने याचा विचार या उपचार पद्धतीला सरकारी योजनेत समाविष्ट केल्यास अनेक गरीब रुग्णांना या योजनेचा लाभ मिळेल असा विश्वासही व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ.महाजन म्हणाले, नाशिक मधील ७८ वर्षीय नीलम देशमुख यांची तब्येत जवळ-जवळ दोन आठवड्यांपासून अत्यंत गंभीर होती. मात्र कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटल येथे त्यांच्यावर पार पडलेल्या ट्रान्सकॅथेटर आओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन (TAVI) शस्त्रक्रियेनंतर त्यांना जणू एक नवा जन्म मिळाला. या शस्त्रक्रियेआधी महिनाभरापासून धाप लागणे, अशक्तपणा, अंधारी येणे, थोड्याफार श्रमांनीही छातीत अस्वस्थ वाटणे आणि झोपेतून सतत जाग येणे अशी लक्षणे जाणवत होती. त्यांना नाशिकमधल्याच एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व तिथे त्यांच्या अनेक चाचण्या करून घेण्यात आल्या.त्यांचा अँजिओग्राम नॉर्मल आला पण 2D एकोकार्डिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये त्यांना तीव्र स्वरूपाचे आओर्टिंक स्टेनोसिस असल्याचे निदान झाले. या स्थितीमध्ये आओर्टा अर्थात महारोहिणीच्या झडपेच्या झापा (आओर्टा अर्थात महारोहिणीच्या सुरुवातीला असलेल्या झडपा, शरीराच्या विविध भागांना पुरविले जाणारे रक्त याच हृदय याच झडपेमध्ये पम्प करत असते) काही अडथळ्यामुळे नीट उघडत नाहीत. रक्तप्रवाहामध्ये आलेल्या या अडथळ्यामुळे हृदय थकले होते व कमकुवत झाले होते (कारण त्याला अतिरिक्त श्रम घ्यावे लागत होते) यालाच ‘लेफ्ट व्हेन्ट्रिक्युलर फेल्युअर’ अर्थात हृदयातील डावे नीलय निकामी होणे असेही म्हणतात.
