स्व. तुकाराम धर्मा माळी यांच्या पुण्यस्मरणदिनी वृद्धाश्रमातील जेष्ठांना अन्नदान !

डोंबिवली : डोंबिवली जवळील भोपर गावात राहणारे समाजसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र (ओबीसी सेल ) चे अध्यक्ष मधुकर माळी यांनी त्यांचे वडील तुकाराम धर्मा माळी यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अन्नदान केले. मानपाडा येथी डॉ. राजेंद्र यादव यांच्या आर.के. सेवा वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांचे आशिर्वाद घेऊन त्यांच्यासाठी मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम घडवून आणला.

भोपरचे मधुकर माळी हे गेली सात वर्षे वडिलांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य म्हणून विविध प्रकारचे सेवाकार्य करीत असतात. यावर्षी त्यांनी घरतल्याघरात साध्या पद्धतीने पुण्यस्मरण केले. आर. के. वृद्धाश्रमातील गरीब गरजू लोकांना अन्नदान करण्यामागे त्यांचा वेगळा हेतू होता. ते म्हणतात ज्यांची पोट भरलेली आहेत त्यांना जबरदस्तीने जेऊ घालण्यापेक्षा भुकेलेल्यांना जेऊ घालणे केव्हाही चांगल आहे हे समजून वृद्धाश्रमातील सर्वांना भोजन देऊन जो आनंद मिळाला तो वेगळाच आहे. या वृत्तीने माझ्या वाडीलानंही आनंद होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आर.के. सेवा वृद्धाश्रमाचे चालक डॉ. राजेंद्र यादव यांनाही या उपक्रमाने भरून आले. त्यांनी त्यांच्या जीवनातही अतिशय कष्ट अनुभवले असल्याने वृद्धाश्रमातील त्या आजीआजोबा यांना त्यांनी मायेची उणीव कधीही भासवू दिली नाही असे स्वतः तेथील वृद्ध सांगतात. मुंबई, ठाणे, कल्याण, कर्जत आणि कसारा आदी विभागातील आजी आजोबा येथे राहतात. ज्यांचे कोणीही नाही अशा लोकांनाही या वृद्धाश्रमात आश्रय देण्यात आला आहे. ज्यांची मुले परदेशात आहेत असे वृद्ध या आर. के. सेवा वृद्धाश्रमात आपले पुढील आयुष्य जगत आहेत. अशा आजी-आजोबांना एक दिवस तरी जेवण दिलं हा वेगळा आनंद आहे असे मधुकर माळी यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते एकनाथ सदू पाटील, जय हनुमान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश जयराम पाटील, मोहन माळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलखुष दामू माळी, शिरीष गोविंद माळी, अशोक बाळाराम म्हात्रे, रोहिदास म्हात्रे, कमलाकर पाटील, मनोज पाटील, कुमार माळी व जय हनुमान युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.