( राजेश्री एन्विरो सोल्युशन्सचा सामाजिक उपक्रम )
डोंबिवली : दिवसेंदिवस डम्पिंग ग्राऊंडवर होणारे कचऱ्यांचे डोंगर ही मोठी समस्या होत आहे. परिणामी प्रदूषणात भर होते. त्यामुळेच कचरा वर्गीकरण करून त्यापासून खत निर्मिती करा असे धोरण शासनाने आणले आणि घनकचरा प्रकल्प उदयास आले. यामधूनच राजेश्री एन्विरो सोल्युशन्स ही सामाजिक संस्था उदयास आली. या संस्थेने सुमारे १५० ते १७५ प्रकल्प उभारून एक वेगळा संदेश जनमानसात दिला आहे. संस्थेने मलंग रोडवरील पार्क रेजन्सी या मोठ्या संकुलात सुमारे 50 टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली. हा प्रकल्प पाहण्यासाठी आता शाळेतील विद्यार्थी येऊन माहिती घेत आहेत.
शनिवारी सर्वोदय विद्यालय आणि रवींद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूलचे सुमारे ५० विद्यार्थ्यांनी मलंग रोड वरील पार्क रेजन्सी येथील घनकचरा प्रकल्पाला भेट दिली. ओल्या कचऱ्यावर प्रकिया कशाप्रकारे होते याची माहिती पृथ्वी इको सोल्युशन्सचे श्रीकांत जोशी यांनी सर्व मुलांना समजावून सांगितली. यावेळी त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवली तसेच वर्गीकरणाचे महत्व समजावून सांगितले.
हा प्रकल्प २०१९ मध्ये राजेश्री एन्विरो सोल्युशन्स यांनी उभारला असून पृथ्वी इको सोल्युशन्स संस्था तो चालवत आहे. येथे सोसायटीमधील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे खत बनवले जाते. सोसायटीचे सर्व सभासद कचरा वेगळा करून देतात आणि हे गेल्या ३ ते ४ वर्ष सुरू असून सुमारे ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती झाली आहे. विशेष म्हणजे हेच खत सोसायटीतील झाडांना आणि काही शेतकरी गटांना दिले जाते. संबंधित शेतकरी याबदल्यात फ्रेश भाजी त्याच्या सोसायटीच्या सभासदांना योग्य दरात देतात आणि ही चेन अशी सुरू आहे.


राजेश्री एन्विरो सोल्युशन्स या संस्थेच्या माध्यमातून विक्रम वैद्य कार्यरत यातून नवीन रोजगार निर्मिती आणि निसर्गाचे संवर्धन करीत आहेत. त्यांच्यामते कल्याण डोंबिवलीतील १००० मोठ्या सोसिटींनी जरी अशा प्रकल्पात सहभाग घेतला १०० टन कचरा डम्पिंग वर जाणार नाही परिणामी प्रदूषण होणार नाही.
यावेळी सर्वोदय विद्यालयाचे महेंद्र पाटील, पार्क रेजन्सी सोसायटीचे पदाधिकारी भान्ग्ले, स्वप्नील यांनीही कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम व त्यावर मात याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली. पार्क रेजन्सी संकुलात सोसायटीने सांडपाण्यावर रिसायकल माध्यमातून पाणी बचतिला दिलेले महत्त्व मोठे असून त्याचेही सर्वांनी कौतुक केले.