कामगार सहायक आयुक्तांच्या हस्ते कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप

डोंबिवली : महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने नुकतेच डोंबिवली पूर्वेकडील स्व. धर्मवीर दिघे सभागृहात कामगार सहायक आयुक्त अंगणा सिरसागर यांच्या वतीने कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी कामगार अधिकारी दीपा भिशे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, शिवसेना  कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील, शिवसेना पदाधिकारी बंडू पाटील, समाजसेवक डॉ. अमित दुखंडे, सतीश मोडक, पालिका अधिकारी नाटेकर, संघटनेचे उपाध्यक्ष भीमराव गुंड, सचिव नामदेव भानुसे, खजिनदार विश्वनाथ रेवगडे, कार्याध्यक्ष कारभारी रेवगडे,सहखजिनदार रामचंद्र वाहक, सहसचिव गजानन डांगे, नाका अध्यक्ष  रामेश्वर शेजुळ, केंद्रीय कमिटी सदस्य चंद्रकांत गायकवाड, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप

दरम्यान संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ म्हणाले, कामगार महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या प्रयत्नाने गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत केली जाते. तसेच महिला कामगारच्या प्रसूतीकरताही आर्थिक मदत केली जाते. काम करत असताना कामगारांचा मृत्यू झाल्यास कामगाराच्या कुटुंबियांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी संघटना शासनाकडे पाठपुरावा करते. संघटनेच्या माध्यमातून आतापर्यत चार हजार कामगारांना सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. तर दोन हजार कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप व दोन हजार पेक्षा जास्त कामगारांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. या कार्यक्रम माध्यमातून यावेळी चारशे कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कामगारांसाठी शासनाच्या योजना संघटनेच्या माध्यमातून पोहोचविल्या जातात.