( आंबेडकरी जनतेचा भव्य मेळाव्यात चव्हाणांचा जय जयकार )
डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रचार रंगात आला असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. चौक सभा, जाहीर प्रचार सभा आणि भेटीगाठीवर उमेदवारांचा भर आहे. उमेदवार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेत असून त्यांच्याकडे मताचा जोगवा मागत आहेत. डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी भेटीगाठींवर भर दिला आहे. डोंबिवलीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या माध्यमातून महायुतीचा जोरदार प्रचार केला जात असून लोकगीतातून विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहचविण्याचा रिपाई पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

डोंबिवली विधानसभा मतदार संघातील उमेदवार रवींद्र चव्हाण हे महायुतीचे उमेदवार असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) पक्षाने रविवारी भव्य स्वागताबरोबर प्रचाराची रंगत आणली. लोकगीताचा कार्यक्रम आयोजित करून अनोख्या प्रचाराची रणधुमाळी केली. लोकगीतामुळे संपूर्ण ठाकूर सभागृह दणाणून गेले होते. दरम्यान चव्हाण यांनी उपस्थित लोकांना सांगितले की, यापूर्वी मी आपल्या समस्या दूर केल्या होत्या आणि निवडून आल्यानंतरही आपल्या उरलेल्या समस्या आहे त्या सर्व पूर्ण करेन असे आश्वासन दिले.

रविवारी 10 तारखेला रोजी डोंबिवलीतील ठाकूर सभागृहात येथे रिपब्लिकन आठवले गट ठाणे प्रदेश माध्यमातून माणिकराव उघडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या समर्थनार्थ आंबेडकरी जनतेचा भव्य मेळावा पार पडला. यावेळी उपस्थित बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. निवडणुकीत आपल्या सर्वांची एकजूट ही देशासाठी अत्यंत आवश्यक असून देशातील सर्व गोरगरीब जनतेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ही एकजूट महत्वाची आहे. ह्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रीय सचिव सुरेश बार्शी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, मीना साळवे, कल्याण डोंबिवली जिल्हाअध्यक्षा, महिला आघाडी शहर अध्यक्षा रिपाई नेत्या प्रमिला सावंत, प्रमिला वाहुळे, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, शिवसेना कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील, विकास खैरनार, संजय पवार, अशोक हिवाळे, शिवाजीराव वाटुरे, लक्ष्मण उशिरे, भीमराव पाटेकर, समाधान तायडे, धम्मपाल सरकटे, वसंत टेकाळे, सुभाष अंभोरे, मंगेश कांबळे, शिवा पवार, विजय शेळके, सुनिता खरात, माया मोरे, मीना गोरे , काशीबाई वाटुरे, जय प्रल्हाद जाधव, गंगाराम जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.