गुन्हे वार्ता

कामगाराचा शॉक लागून मृत्यू

कंपनी मालक आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल

डोंबिवली, दि. ०२ (प्रतिनिधी) : पुर्वेकडील एम आय डी सी परिसरातील एस पी मेटल वर्क्स प्रा ली कंपनीत इलेक्ट्रिक चे काम करत असताना 26 जून रोजी आनंद साळगावकर या  कामगाराचा शॉक लागल्याने मृत्यू झाला होता .या घटनेनंतर आनंद यांची पत्नी अपूर्वा साळगावकर यांनी कंपनीचे मालक आणि मॅनेजर यांनी आपल्या पतीला इलेक्ट्रिक चे काम करते वेळी आवश्यक त्या सुविधा पुरवल्या नाहींत तसेंच निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती या तक्रारी नुसार पोलिसांनी एस पी मेटल वर्क्स प्रा ली कंपनीचे मालक आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

डोंबिवली, दि. ०२ (प्रतिनिधी) : पूर्वेकडील शेलार चौक इंदिरा नगर मध्ये राहणारा साईनाथ कसबे 23 या तरुणाला काही दिवसांपुर्वी एक फोन आला त्याला डोंबिवली पुर्वेकडील मेघर्स इंटरप्रायझेस मध्ये बोलवले तसेच बँकेत नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे घेतले .10 दिवस उलटूनही नोकरी बाबत काहीच उडवा उडवीची उत्तरे दिल्याने कसबे यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी मेघर्स इंटरप्रायझेसचे मालक रवींद्र वामन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.