शालेय विद्यार्थ्यांचा स्टेशन परिसरात चित्रकलेतून जनजागृतीचा संदेश

डोंबिवली : शिवसेना डोंबिवली शहर शाखेतर्फे डोंबिवली रेल्वे स्थानकातील व परिसरातील भिंतींवर आज सकाळपासून शेकडो शालेय विद्यार्थी भिंतीवर विविध संदेश देणारी चित्रे रेखाटण्यात दंग होती. बेटी बचाव, स्वच्छतेचे महत्व, पर्यावरण, पाणी वाचवा असे संदेश या चित्रातून देत होते. नागरिकही ते कौतुकाने बघत होते व विद्यार्थ्यांचे कौतुक करत होते डोंबिवलीतील ४७ शाळांतील सुमारे २५० ते ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

शहरप्रमुख राजेश मोरे या संदर्भात माहिती देताना म्हणाले हिंदुहृदयसम्रट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९१ व्या जयंती निमित्त डोंबिवली शहर शाखेतफे २३ ते २९ पर्यंत विविध कार्यक्रमांचा सप्ताह साजरा करण्यात आला. शिवसेनाप्रमुख स्वत: कलाकार असल्याने व ते स्वच्छतेबाबत काटेकोर असल्याने स्टेशनमधील व परिसरातील भिंती स्वच्छ करुन त्यावर विविध उपक्रमांचा संदेश देणारी चित्रे रेखाटण्याचा निर्णय घेण्यात आला. डोंबिवलीतील सुमारे ४७ शाळांतील सुमारे २५० ते ३०० विद्यार्थी यात सहभागी झाले. आज सकाळपासून विद्यार्थ्यानी स्टेशनमधील व परिसरातील भिंती पांढरा रंग लावून स्वच्छ करण्यात आल्या. त्यावर विविध जनजागृतीचे विषय देण्यात आले व त्याप्रमाणे स्वच्छता, पर्यावरण, बेटी बचाव यांचा संदेश देणारी चित्रे विद्यार्थ्यानी रेखाटली. यामध्ये सहभागी विद्यार्थ्याना प्रशस्तिपत्र देण्यात आली तसेच शिक्षकांचाही गौरव करणत आला. आजच्या या उपक्रमाने सप्ताहाची सांगता झाली असेही मोरे सांगितले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहर संघटक तात्या माने, महिला संघटक मंगला सुळे, उपशहरप्रमुख व शिवसेनेचे परिवहन सदस्य संतोष चव्हाण व सतीश मोरे, विजय भोईर यांनी भरपूर मेहनत घेतली असेही त्यानी सांगीतले.