गुन्हे वृत्त

सोनसाखळी चोरी

कल्याण : पश्चिमेतील आधारवाडी येथील मानस दीप इमारतीत राहणाऱ्या मंगला कल्याणराव देशपांडे (८६) यांनी आपली १७ ग्रेम वजनाची सोन्याची माळ घरातील पलंगाच्या गादीखाली ठेवली असता चोरीला गेली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहाड मध्ये घरफोडी

डोंबिवली : शहाड येथील अंबर हॉटेल जवळील ज्योती पेलेसमध्ये राहणाऱ्या सुरेखा कोंडीबा (५१) या घर बंद करून अध्यात्मिक बैठकीसाठी गेल्या होत्या .चोरट्यांनी तीच संधी साधून घराचा कडीकोयंडा तोडून ५ हजार रुपयांची रोकड, १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल व १२ हजार रुपये किमतीचे दागिने घरफोडी करून चोरून नेले .याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पूर्ववैमनस्यातून मारहाण

कल्याण : पूर्वेतील लोकसेवा नगर मधील साईधाम चाळीत राहणारा अनिकेत दिलीप आपले मित्र नमित मोरे व अक्षय पालवकर याच्या सोबत केस कापण्यासाठी सलून मध्ये जात होते. पिंगारा बार जवळ समोरून दीपक जाधव व आशु पांडे हे दोघे मोटारसायकलवरून खाली उतरले आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.