डोंबिवली : पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील माहिती अवगत झाली पाहिजे. देशाला संस्कारित विद्यार्थी घडण्याची गरज आहे. आजच्या विद्यार्थ्यांना पारतंत्र्यातील परिस्थितीची जाणीव नाही. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करण्याचे काम शाळेपासून सूर होत असते यासाठी मुलांचा सर्वागिण विकास साधण्यासाठी शाळेत विविध उपक्रम महत्वाचे ठरतात असे वक्तव्य डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष प्रभाकर देसाई यांनी केले.डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव सोहळा आयोजित केला होता त्यावेळी प्रभाकर देसाई बोलत होते. यावेळी मुख्याध्यापिका हर्षु बेल्लारे, माध्यमिक मुख्याध्यापिका निकिता शेवडे, प्रशासकीय अधिकारी नेहा नारकर, डॉ. सुचित्रा कामत, शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते.यावेळी देसाई पुढे म्हणाले, शाळेत उपक्रम निवडत असताना उपक्रम उदिष्टे, जीवनावश्यक उदिष्टे अभ्यासक्रम सांगड आणि पाठ्यक्रम याचा समावेश करून विविध उपक्रम घेणे आवश्यक आहे. मुलांची शिक्षणाशी नाळ जोडली तरच मुलांना शाळा हवी हवीशी वाटू लागते.दरम्यान सिस्टर निवेदिता शाळेतील विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीसह लेझीम पथकांनी शाळेच्या आबासाहेब पटवारी युवा मल्टी स्पोर्ट्स प्लेग्राऊंड पासून आरंभ झालेल्या भव्यदिव्य रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीत केजी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव सोहळा म्हणून विविध स्पर्धा घेण्यात असल्या यासाठी निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले गेले. देशभक्तीपर गीते,नृत्य यांच्या माध्यमातून विद्यार्थी अमृत महोत्सवाची तयारी केली होती. बालगोपालांनी झेंड्याचे चित्र काढून कलात्मक रंगसंगती साधून आपले झेंड्याप्रती प्रेम व्यक्त केले. तिरंगी पताकांनी आणि फुलांच्या तोरणांनी शाळा सुंदर सजविण्यात आली होती. यासाठी पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सिस्टर निवेदिताचे मुख्य अधिकारी, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सोहळा यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.