नीट 2023 राष्ट्रीय स्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेत डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचे यश

डोंबिवली :  ७ मे २०२३ रोजी देशपातळीवर पार पडलेल्या नीट 2023 चा निकाल बुधवारी जाहीर झाला. देशभरातून या परीक्षेला २० लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत डोंबिवलीकर श्रेयसी दुर्वे या विद्यार्थिनीने ७२० पैकी ६९४ गुण मिळवून एक नवीन उच्चांक केला आहे.

पाटकर विद्यालयातून शालेय शिक्षण घेतलेल्या श्रेयसी दुर्वे हीने नीट परीक्षेचीची तयारी एलियन करिअर इन्स्टिट्यूटच्या डोंबिवली शाखेतून केली. त्याचप्रमाणे सुजल प्रजापती – ६५१/७२०, मीत नारखेडे -६२९/७२० व विशाल चौधरी – ६२४/७२० यांनी ही उत्तम कामगिरी करून या परीक्षेत एक वेगळा ठसा उमटविला आहे.

एलियन करिअर इन्स्टिट्यूटचे शिक्षकवृंद आणि यशस्वी विद्यार्थी

डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचा कौतुक सोहळा एलियन करिअर इन्स्टिट्यूटमध्ये संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या आईवडिलांसह शिक्षकवृंद उपस्थित होते.

या यशाबाबत श्रेयशी म्हणाली,मला खूप आनंद होत आहे, दोन वर्षांपासून खूप मेहनत घेतली होती. आता डॉक्टर होण्याचे स्वप्न या परीक्षेत मिळालेल्या यशामुळे पूर्ण होईल. शिक्षक जसं सांगितलं त्याच पद्धतीने अभ्यास केला. सर्व प्रकारच्या परीक्षा एलियन मध्ये छान घेतल्या होत्या. स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, शिक्षकांनी सांगितलेलं ऐकून अभ्यास करा असा संदेश तिने विद्यार्थ्यांना दिला आहे. पुढे डॉक्टर होऊन डोंबिवलीकरांची सेवा करणार असेही सांगितले.

तर एलियन करिअर इन्स्टिट्यूटचे गणेश देसाई म्हणाले,
ही स्पर्धा परीक्षा आहे, काही हजार मुलांनाच एमबीबीएससाठी प्रवेश मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवणे, परीक्षा घेणे आणि त्यांचे मनोधैर्य कायम ठेवणे यासाठी शिक्षक काळजी घेत असतात. त्यामुळेच चांगलं यश विद्यार्थ्यांना मिळाल आहे. डोंबिवलीतील मुले राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यशस्वी होत आहेत. वैद्यकीय कोर्सेससाठी नीट ही राष्ट्रीय परीक्षा होत असते.