( मराठीला अभिजात भाषेचां दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे मनसे तर्फे स्वागत )
डोंबिवली : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी डोंबिवली शहर शाखेने डोंबिवली पश्चिमेकडील द्वारका हॉटेल समोरील चौकात साखर व पेढे वाटून तमाम डोंबिवलीकर नागरिक बांधवाचे तोंड गोड केले. फटाक्यांची आतिषबाजी व घोषणा करीत एकच जल्लोष केला.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेली बारा वर्ष मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत होते. त्याच्या या अथक प्रयत्नांना अखेरीस यश आले आणि केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला. परिणामी मराठी भाषेचा गौरव झाला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी डोंबिवलीतील मनसे पदाधिकाऱ्यांसह मनसैनिकांनी पश्चिमेकडील द्वारका हॉटेल समोरील चौकात नागरिकांना सारखर व पेढे वाटून तोंड गोड केले. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर रेल्वेने घरी परतणाऱ्या नागरिकांना पेढे वाटून आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला सर्वांनी तोंड गोड करा असा जयघोष मनसे विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे रेल्वे प्रवासीवर्गाला मोठ्या कौतुकाने सांगत होते. राज ठाकरे यांचे हे स्वप्न पूर्णत्वास आले याचा मोठा आनंद आहे असेही सांगून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी मनसे विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितले की गेली एक तपाहून अधिक काळ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या मागणी करिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेच्या माध्यमातून मागणी करीत होते. त्यांच्या मागणीला यश आले असल्याने मराठी माणसाचे अखेरीस स्वप्न पूर्ण झाले. मराठी भाषा साता समुद्रापार पोहाचली असताना आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने हा सोनियाचा दिवस आहे.

दरम्यान मनसे झिंदाबाद, राज ठाकरे यांचा विजय असो असा जयघोष सुरू होता. यावेळी विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे, महिला शहर अध्यक्षा मंदाताई पाटील, शहराध्यक्ष राहुल कामत, उपशहर अध्यक्ष श्रीकांत वारिंगे, राजू पाटील, प्रेम पाटील, शहर सचिव संदीप म्हात्रे, विभाग अध्यक्ष कदम भोईर, रितेश म्हात्रे, चेतन म्हात्रे, उपविभाग अध्यक्ष आश्विन पाटील, महिला पदाधिकारी अर्चना गायकवाड, श्रद्धा किर्वे, महेश पांचाळ आदी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी डोंबिवली शहर शाखेने डोंबिवली पश्चिमेकडील द्वारका हॉटेल समोरील चौकात साखर व पेढे वाटून तमाम डोंबिवलीकर नागरिक बांधवाचे तोंड गोड केले. फटाक्यांची आतिषबाजी व घोषणा करीत एकच जल्लोष केला.