डोंबिवलीत शिवसेना (उबाठा) चे  गॅस दरवाढ विरोधात आंदोलन

(महिलांनी चुलीवर भाजल्या भाकऱ्या )

डोंबिवली : घरगुती सिलेंडरची किंमत ५० रुपयांनी वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आता घरगुती पीएनजी गॅस वाढल्याने महिलांचे गणित बिघडले. इतकेच नाही तर भाजपा सरकारने वाहनांच्या सीएनजी गॅसची दरवाढ केली. या सर्व भाववाढ विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या आदेशाने शिवसैनिकांनी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्टेशन समोर भर चौकात निषेध आंदोलन केले. महिलांनी चुली पेटवून भाकऱ्या भाजल्या.

शिवसेना डोंबिवली (पश्चिम) शहरप्रमुख प्रकाशभाऊ तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात आंदोलन केले. या निषेध आंदोलनात उपशहर प्रमुख सुरज पवार, संजय पाटील,  सुरेश परदेशी, शाम चौगले, प्रमोद कांबळे, नितीन पवार, राजेंद्र सावंत, सुनील पवार, अंकुश सूर्यवंशी,  सुप्रिया चव्हाण, प्रियंका विचारे, अनिल मुथा, सुरेखा सावंत, अर्चना पाटील, रश्मी कांबळे,  सानिका खाडे, सायली जगताप, दांडगे नीलिमा,  विश्वासराव, रेश्मा सावंत, भाग्यश्री चव्हाण आदींसह नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी तेळगोटे म्हणाले, निवडणुकीत लाडकी बहीण सांगत महिलांची मते घेवून आता भाववाढ केली. केंद्र व राज्य सरकारने महिलांची दिशाभूल केली आहे. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.