शेकडो बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप

( महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचा स्तुत्य उपक्रम )

डोंबिवली : महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या पाठपुराव्यामुळे शासकीय योजने अंतर्गत बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० कामगारांना आमदार राजेश मोरे आणि निमंत्रित मान्यवरांचा हस्ते याचं वाटप करण्यात आलं. महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचा स्तुत्य उपक्रमामुळे कामगार आनंदित झाले.

पूर्वेकडील स्व. धर्मवीर दिघे सभागृहात पार पडलेल्या महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचा शानदार कार्यक्रमासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, शिवसेना कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील माजी, नगरसेवक संजय पावशे, उद्योजक विकी हिंगे, ताराराणी ब्रिगेड अध्यक्ष मेघा मोरे, सहकार भारती पदाधिकारी शैलेश दुरगुडे, पायल मार्बल मालक सुरेश जैन, समाजसेविका रेखा कांबळे, सेफ्टी असोसिएशन विशाल शेटे, रिपब्लिकन नेते आनंद नवसागरे, सिनेअभिनेत्री अक्षदा दास, डॉ. शोभा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांनी सांगितले की, कामगार महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे खडतर प्रयत्न आणि पाठपुरावा यामुळे हे शक्य झाले असून या गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. याशिवाय  दरवर्षी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. मुख्य म्हणजे कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी व महिला कामगाराच्या प्रसूतीकरताही आर्थिक मदत केली जाते. जर काम करताना एखाद्या कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी संघटना शासनाकडे पाठपुरावा करते. काम करताना अपघात होवू नये यासाठी चार हजार कामगारांना सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. तर दोन हजार कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप व दोन हजार पेक्षा जास्त कामगारांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. कामगारांसाठी असणाऱ्या शासन योजनेची माहिती प्रत्येक सदस्याला दिली जाते.

यावेळी आमदार राजेश मोरे म्हणाले संघटना कामगारांच्या हितासाठी काम करीत आहे. या संघटनेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मोलाचे सहकार्य मिळत असून कामगारांच्या योग्य प्रश्नासाठी सहकार्य मिळत असते. लक्ष्मण मिसा‌ळ हे कामगारांसाठी सतत झटत असल्याने या संघटनेच्या सदस्यांमध्ये सतत वाढ होत आहे.

कामगारांच्या गृहउपयोगी वस्तूंचे वाटप कार्यक्रमासाठी नामदेव भानुसे , विश्वनाथ रेवगडे, रामचंद्र वाघ, गजानन डांगे, चंद्रकांत गायकवाड, कमलाकर पाटील, केशव मिसाळ, वंदना जाधव, भुजंग कोरके, संजय मस्के, बद्रीनाथ मखरे यांनी मोलाचे सहकार्य मिळाले.