डोंबिवली : महाराष्ट्रातील मल्याळी वंशाच्या लोकांची शक्ती आणि एकता राखण्याच्या उद्देशाने जागतिक मल्याळी महासंघ (WMF) अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिषदेचे (MSC) स्थापन करण्यात आली. सदर कार्यक्रम शनिवारी कंट्री इन अँड सूट्स बाय रेडिसन, नवी मुंबई येथे संपन्न झाला. हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे असे वक्तव्य केरळ राज्यातील हरिपद येथील आमदार रमेश चेन्निथला यांनी केले.

मल्याळी महासंघाने एका ऐतिहासिक कार्यक्रमात, जागतिक मल्याळी महासंघाने (WMF)
शनिवार, १४ जून २०२५ रोजी कंट्री इन अँड सूट्स बाय रेडिसन, नवी मुंबई येथे त्यांच्या महाराष्ट्र राज्य परिषदेचे (MSC) उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळमधील हरिपद येथील आमदार रमेश चेन्निथला यांच्या हस्ते झाले.
आमदार चेन्निथला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी सिडकोच्या मुख्य महाव्यवस्थापक गीता ए. पिल्लई, प्रख्यात उद्योजक व समाजसेवी डॉ. वर्गीस मूलन आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर ऐतिहासिक कार्यक्रमाला डॉ. जे. रत्नकुमार (ग्लोबल चेअरमन, डब्ल्यूएमएफ), रेजिन चल्लापुरम (ग्लोबल डायरेक्टर), टॉम
जेकब (ग्लोबल ट्रेझरर), डॉ. राजेंद्रप्रसाद (आशिया रीजन प्रेसिडेंट), डी. फ्रान्सिस (आशिया रीजन व्हाईस प्रेसिडेंट) आणि भारत आणि परदेशातील इतर राष्ट्रीय आणि प्रादेशिक डब्ल्यूएमएफ नेते उपस्थित होते.

दरम्यान नवनिर्मित डब्ल्यूएमएफ-महाराष्ट्र राज्य परिषदेचे औपचारिक उद्घाटन आणि स्थापना करण्यात आली. परिषदेच्या कार्यकारिणीत संरक्षक: डॉ. ओमेन डेव्हिड, अध्यक्ष: डॉ. रॉय जॉन मॅथ्यू, उपाध्यक्ष: बिजॉय ओमेन, सिंधू नायर
सरचिटणीस: सीए डोमिनिक पॉल, कोषाध्यक्ष : बिनॉय थॉमस, सहसचिव : एन.टी. पिल्लई, अॅड. राखी सुनील यांच्या नावांची घोषणा करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यान, परिषदेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. ओमेन डेव्हिड यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना संरक्षक पदावर बढती देण्यात आली. त्यांना WMF- ग्लोबलने WMF- महाराष्ट्र राज्य परिषदेच्या स्थापनेत त्यांनी दिलेल्या गुणवंत सेवेबद्दल त्यांचे कौतुक म्हणून सन्मानित केले. डॉ. डेव्हिड हे महाराष्ट्रातील मल्याळी समुदायासाठी दीर्घकाळ मार्गदर्शक व शक्तीस्थान म्हणून कार्यरत आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सांस्कृतिक कार्यक्रमात मल्याळी व मराठी नृत्याविष्कार सादर करण्यात आले. नंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांव्हा प्रतिकात्मक शपथविधी झाला. परिषदेचे उपाध्यक्ष बिजॉय ओमेन यांनी सर्व पाहुणे, प्रायोजक, कलाकार सर्वांचे आभार व्यक्त केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
WMF-महाराष्ट्र राज्य परिषदेचे उद्दिष्ट राज्यातील मल्याळी सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणे – आणि त्याचबरोबर WMF च्या जागतिक उपस्थितीचा अभिमानास्पद भाग म्हणून १६० हून अधिक देशांमध्ये परिषदेचे काम होत आहे.