शिवसेना तर्फे विद्यार्थांना मोफत शैक्षणिक साहित्य म्हणून वह्या वाटप

डोंबिवली : प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे या उद्देशाने विद्यार्थ्याला मोफत शैक्षणिक साहित्य शिवसेना माध्यमातून प्रत्येक वर्षी दिले जाते. त्याचाच भाग म्हणून मानपाडा विभागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. शिवसेना पदाधिकारी दत्ता वझे यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम करण्यात आला. शालेय वह्या घेण्यासाठी विद्यार्थांनी गर्दी केली होती.

प्रत्येक विद्यार्थ्याला वह्या मिळाल्या पाहिजे यासाठी या वह्या वाटप कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांनी मोठे सहकार्य केले. या कार्यक्रमाला गुलाब वझे, अर्जुन पाटील, दत्ता वझे , गजानन मांगरुळकर, अभिमन्यू म्हात्रे, रमेश पाटील, सागर‌ म्हात्रे, भास्कर वझे, दत्ता म्हात्रे, अमित वझे, महादु भोईर दिलीप चव्हाण, आनता‌ पाटील,‌‌ ज्ञानेश्वर माळी , प्रकाश भोईर, बाळु भोईर, बबन पवार आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ती उपस्थित होते.

दरम्यान दत्ता वझे म्हणाले, शिवसेना पक्ष वीस टक्के राजकारण आणि ऐशी समाजकारण म्हणून काम करीत असते. वर्षभर अशी कामे होत असतात. शिवसेना शाखेत आलेल्या सर्वांच्या अडीअडचणी ऐकून त्या सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात काम होत असते. आमच्या विभागात झालेली विकासकामे येथील नागरिकांच्या भावली असून आजही लोक शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत. त्यामुळेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमचा विजय झाला. आताही लोकाचा आशीर्वाद आम्हालाच मिळेल असा विश्वास आहे.