डोंबिवली : पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात रात्री अचानक साप चावल्याने मावशी आणि भाचीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ डोंबिवलीतील ठाकूर कुटुंबावर आली. मात्र सदर घटनेत डोंबिवली तील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे या मावशी आणि भाचीला तिचा जीव गमवावा लागला आहे. पूर्वेकडील खांबळपाडा परिसरात राहणाऱ्या कुटुंबावर हा आघात झाला आहे. रविवारी घरात झोपेत असणाऱ्या चार वर्षीय मुलीला व तिच्या मावशीला मण्यार जातीचा साप चावला. ताबडतोब दोघींनाही डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यापूर्वीही शास्त्रीनगर रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे दुर्दैवी घटना घडल्या आहेत. परिणामी शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी जावे की नको ? असा सवाल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पडत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी रुग्णासाठी पालिका प्रशासनाने शास्त्रीनगर रुग्णालय योग्य कसे ठरेल याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.
मयत प्रणवी विकी भोईर व श्रुती अनिल ठाकूर या नात्याने मावशी-भाची असलेल्या दोघेही खंबालपाडा येथील मामाकडे आल्या होत्या. मामाच्या घरात झोपेत असताना प्रणवी व श्रुती यांना मन्यार जातीचा साप चावला. ताबडतोब कुटुंबीयांनी डोंबिवलीतील पश्चिमेककडील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले. दरम्यान हॉस्पिटल मध्ये साप चावल्यावरील उपचार म्हणून इंजेक्शने दिले. त्यानंतर पुढे चांगल्या उपचारासाठी ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले. त्यासाठी रुग्णालयाची अँब्युलन्स देण्यात आली होती. रविवारी सकाळी पालिकेचे अँब्युलन्स चालक श्रीकांत नलावडे हे रुग्णासह 6:45 वाजता निघाले ते थेट ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 7:10 वाजता पोहचले. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी प्रणवी या चार वर्षांच्या मुलीला मृत म्हणून सांगीतले. तर श्रुती अनिल ठाकूर यांच्यावर पुढील उपचार सुरू केले. मात्र मंगळवारी 24 वर्षीय श्रुती यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णाल्यावर मुलीचे काका कल्पेश भोईर यांनी दोषारोपण केले आहे. जर अतीगंभीर आजारावर रुग्णालयात उपचार मिळत नसतील तर या रुग्णालयाची गरज काय असा सवाल केला.

याबाबत शास्त्रीनगर रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापकीय डॉक्टर योगेश चौधरी यांनी मात्र कुटुंबियांचा दोषारोप खोडून काढला असून आम्ही योग्य ती ट्रीटमेंट केली आहे. सापांचे अनेक प्रकार असून चावलेला साप कोणता यावरही औषोधपचार अवलंबून असतो. यामुळे आम्ही ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात पाठविले असेही सांगितले.

मंगळवारी प्रणवी विकी भोईर यांचाही मृत्य झाला. या दुर्दैवी घटनांमुळे कुटुंबातील नातेवाईक तसेच दुःखी लोक शास्त्रीनगर रुग्णालयात आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे शास्त्रीनगर रुग्णालयात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. डोंबिवली विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे हे काही अघटीत घटना होऊ नये म्हणून शास्त्रीनगर रुग्णालयात ठाण मांडून होते.
