डोंबिवली, दि. ३० (प्रतिनिधी) : परीक्षेमध्ये नुसते टक्केवारी मिळविण्यासाठी धडपडू नका. विद्यार्थी नुसता परीक्षार्थी नको तर तो सर्वगुणी यशस्वी झाला पहिले. पण हे सर्व साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चिंतन मनन केलं पाहिजे. चिंतन मनन केल्याने नुसत्या परीक्षेत तुम्ही यशस्वी होणार नाही तर तुमची पुढील भावी वाटचालही यशस्वी होईल असे वडिलकीचा मौलिक उपदेश विद्यार्थ्यांना केला.
भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ५९ च्या नगरसेविका विद्याताई म्हात्रे यांनी प्रभागातील १०वी-१२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बि.आर.हरणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजी महाविद्यालयाचे संचालक मंगेश हरणे, विद्यारत्न क्लासेसचे संचालक विश्वास भोईर, भाजपा कल्याण जिल्हा चिटणीस राजेश म्हात्रे, भाजपा महिला मोर्चाच्या ममता तावडे, माजी नगरसेविका रेखा असोदेकर, उद्योजक प्रदीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पाटील पुढे म्हणाले, पालकांनी हे समजून घेतले पाहिजे कि, आपण कितीही महागडा क्लास लावला तरी शाळेत कॉलेज मध्ये शांतपणे ऐकते का, प्रश्न विचारून आपल्या शंकांचे उत्तर मिळवितात का हे सर्व जाणून घेतले पाहिजे. सगळे विद्यार्थी चांगलेच असतात, कोणाचीही गुणवत्ता कमी नसते पण चिंतन-मनन करण्यात कमी पडतो म्हणून टक्केवारी कमी होते. मुख्य म्हणजे पालकांनी विद्यार्थ्याच्या गुणांची कलचाचणी घ्यावी आणि त्या दिशेने मुलांना पाठवायला पाहिजे. आज विविध क्षेत्र प्रत्येकासाठी वाट बघत आहेत त्यासाठी आपण डोळस व्हायला पाहिजे.
तर यावेळी विश्वास भोईर यांनी “करियर” या विषयावर मार्गदर्शन करून सांगितले कि, विद्यार्थ्यांना फक्त त्यांचे शिक्षकच उत्तमपणे ओळखतात पण तो खरा शिक्षक असला पाहिजे नोकरी करणारा माणूस नको. विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना त्यांनी “करिअर” म्हणजे काय सांगताना सांगितले कि, सामाजिक आणि आर्थिक दर्जा कोणत्याही चांगल्या मार्गाने प्राप्त करणे आणि म्हणून करिअर महत्वाचे आहे. यावेळी सी.ए. परीक्षेत भारतातून प्रथम आलेला राज परेश शेठ याचाही सन्मान करण्यात आला. गुणगौरव सोहळ्यात यशस्वी विथार्थ्याना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, अभ्यासात्मक वस्तूंचा सेट भेट म्हणून देण्यात आला. यावेळी सखीमंचच्या स्वाती कुलकर्णी यांचाहि सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोपतराव, सुनिल चित्रे, प्रदीप चौधरी, सतीश देशपांडे, सुनील सामंत, सचिन दुर्वे, सुरेश जोशी, नमिता दोंदे, शारदा शिंदे, स्मिता जोशी, सुनिता कुरकुडे, राजा जाधव यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नमिता दोंदे यांनी केले.