डोंबिवली, दि. १६ (प्रतिनिधी) : प्रभागात कोणत्या समस्या आहेत त्याचे नियोजन करून कामाची आखणी करण्यात नेहमीच आघाडीवर असणारे माजी सरपंच मुकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील यांनी वैशिष्ट्यपूर्ण कार्याने स्वातंत्र्यदिन साजरा केला. विशेष म्हणजे १९४७ रोजी स्थापन झालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रथम शिक्षकांच्या हस्ते ध्वजारोहण केले आणि पालकांना व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढला.
कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग क्रमांक 110 सोनारपाडा गोळवली प्रभागात येणाऱ्या
औद्योगिक विभागातील शिवाई बालक मंदिर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्याच्या पालकांना शाळेत ये-जा करतांना भरपूर वेळ उभे राहावे लागत असे. याचा समस्येचा विचार करून विद्यार्थी व पालकांना बसण्यासाठी सुसज्य आसन व्यवस्था प्रमिला पाटील यांनी स्वखर्चाने केली. सदर कार्यक्रमाचे उदघाटन तालुका प्रमुख श्री एकनाथ सदु पाटील यांच्या हस्ते करण्यात केला. तसेच स्वातंत्र्य दिना निमित्त माजी विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांना सन्माचिन्ह देऊन त्यांचा सत्कार व दहावी-बारावी ऊतीर्ण विद्यार्थीचा गुण गौरव असा भरगच्च कार्यक्रम केला. यावेळी उप तालुका प्रमुख बंडु गजानन पाटील, मा. नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, विभाग प्रमुख धर्मराज शिंदे उप विभाग प्रमुख राजु नलावडे, जेष्ट शिवसैनिक बबन काळे, अशोक पगारे, बबन पगारे, शरद पाटील, कृष्ण पाटील, मा. सरपंच मुकेश पाटील, शाखा प्रमुख मंदार स्वरगे, चंद्रकांत ठाकुर, भास्कर पाटील, विलास पाटील, ओमकार पाटील, चेतन पाटील, सुनिल पालकरी, गोरख ठाकुर, अनिल पाटील उपस्थित होते.