वृषाली श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळागौर सोहळा

डोंबिवली, दि. २२ (प्रतिनिधी) : पूर्वेकडील सर्वेश सभागृहात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक महिलांनी मंगळागौरी सोहळ्याचा आनंद घेतला. श्रावण महिना हा शुद्ध आणि सात्विकतेच आवरण आहे आणि  महाराष्ट्राची न्हवे तर संपूर्ण जगाची संस्कृती जोपासणारी मंगळागौर हा सण समारंभ साजरा केला जातो.  लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही या महिन्यातच साजरी केली जाते आणि मुख्य म्हणजे महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व त्यांना एक आनंदाचा क्षण देण्याकरिता शिवसेना महिला शहर संघटक  कविता चौधरी गावंड आणि  शिवसेना महिला आघाडी यांनी एकत्रीत येऊन मंगळागौर कार्यक्रम आयोजित केला होता.

पारंपरिक संस्कृती जपणारा मंगळागौर या सणात  विविध प्रकारचे वेशभूषा, नृत्य, खेळ खेळले गेले. विजेत्यांना आणि सहभागी झालेल्या महिलांना पैठणी साडीचे व विविध प्रकारचे आकर्षक बक्षिसे देण्यात आले. या कार्यक्रमात सुहासिनींने आपल्या पतीचेे नाव घेणे, रंगीत तालीमचा खेळ खेळून, गायन अशा अनेक प्रकारे महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. सदर कार्यक्रमामध्ये पारंपरिक गाणी व माहेरचे वर्णन करणाऱ्या गाण्यांवर सुंदर प्रकारे महिलांनी नृत्य सुद्धा केले.  मुख्य म्हणजे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  लताताई एकनाथ शिंदे व  वृषाली श्रीकांत शिंदे या उपस्थित होत्या आणि त्यांनी सुद्धा या खेळात भाग घेतला. माजी महापौर आरती मोकल, नगरसेविका भारती राजेश मोरे,  कविता चौधरी गावंड व शिवसेना महिला आघाडी यांनी सोहळा आयोजित केला होता.