थोडक्यात महत्वाच्या बातम्या

घराघरात महानगर गॅस पोहोचविण्याच्या कामाचा डोंबिवलीत गुरुवारी शुभारंभ

डोंबिवली, दि. १३ (प्रतिनिधी) : डोंबिवलीकरांना घराघरात पाइ्रपलाईनने गॅस पुरवठा व्हावा यासाठी शिवसेनेचे कल्याणचे खा डॉ.  श्रीकांत शिंदे गेली अडीच वर्षे पाठपुरावा करत होते. त्याला आता यश आले असून उद्या गुरुवार १४ सप्टेंबर रोजी औद्योगिक निवासी भागातील पाच इमारतींना पुरवठा सुरु होणार आहे. यामुळे डोंबिवलीकरांची प्रितक्षा संपली असून येत्या दिड वर्षात संपूर्ण डोंबिवलीत घरोघरी गॅस पुरवठा पाइ्रपलाईनने होणार आहे.

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे हस्ते गुरुवारी सायंकाळी पाच वाजता औपचारिक समारंभ होणार असून पहिल्या टप्प्यात पुष्पक, स्नेहा, मंदार, श्रीधर सुदामा या सहकारी संस्थातील सुमारे ३५० ग्रहकांना याचा लाभ होणार आहे. पाईपलाईन टाकण्याचे काम या सोसायटयांपर्यत पूर्ण झाले आहे. येत्या दिड वर्षात संपूर्ण डोंबिवलीकरांना पाईपलाईनमार्फत गॅस पुरवठा होणार आहे.

डोंबिवली विघानसभा मतदार संघातील शिवसैनिकांचा १७ तारखेला भव्य मेळावा

डोंबिवली, दि. १३ (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना, कार्यकर्ते व शिवसेना अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते यांचा मेळावा रविवार १७ सप्टेंबर रेाजी सायंकाळी ५ वाजता भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

डोंबिवली शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यानी माहिती दिली. या मेळाव्याला कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लाडगे व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, महिला संपर्क संघटक संध्या वढावकर, आमदार सुभाष भोईर, महिला जिल्हा संघटक लता पाटील, युवासेना जिल्हाध्यक्ष नगरसेवक दिपेश म्हात्रे आदि उपस्थित रहाणार आहेत. सभेला शिवसैनिकांनी मोठया संख्येने हजर रहावे असे आवाहन भाऊ चौधरी यांनी केले आहे.

डोंबिवलीत गडगडाटासह कोसळलेल्या पावसाने इलेक्ट्रॉनिक वस्तू नादुरुस्त

डोंबिवली, दि. १३ (प्रतिनिधी) : डोंबिवलीत गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळेस जोरदार पाऊस व विजेचा गडगडाट होत असून यामुळे डोंबिवलीत मोठया प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू नादुरुस्त झाल्याअसून दुरुस्तीसाठी सर्विस सेंटरला मोठी गर्दी झाली आहे.

रविवारी रात्री पडलेल्या परतीच्या पावसाने जोरदार पावसासह मोठया प्रमाणावर विजेचा कडकडकाट होत होता यामुळे सुमारे ४०० ते ५०० अॅडप्टर उडाले तर सुमारे २०० ते २५० दुरदर्शन संच, तेवढेच फ्रीज जळल्याची तक्रार आहे. अनमेाल म्हात्रे, गावडे, संगीता गुप्ता या तंत्रज्ञानी माहिती दिली. यामुळे नागरिकांची मोठया प्रमाणात दुरुस्तीसाठी तंत्रज्ञानाकडे गर्दी झाली आहे. रोज संध्याकाळी होणाऱ्या पावसामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून सांयंकाळी पाऊस सुरु झाला की नागरिक टी.व्ही. संच बंद ठेवत आहेत.