वनराईच्यावतीने डोंबिवलीत कृषी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

डोंबिवली : शेतकरी जगला तरच आपल भवितव्य चांगले आहे. शेतकरी जे पिकवतो ते आपण कृत्रिमपणे बनवू शकत नाही म्हणून शहरी व ग्रामीण भागाला जोडून बळीराजाला मदत ठरेल आसे हे प्रदर्शन आहे. झपाट्याने ढासळत चाललेले पर्यावरण वाचविण्यासाठी नैसर्गिक व सेंद्रिय पध्दतीचे महत्व फक्त सांगून न थांबता ते प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचे काम आज अचूकपणे वनराई प्रतिष्ठान करित आहे.असे प्रतिपादन पालक मंत्री एकनाथ शिंदे यानी उद्घाटन प्रसंगी केले.

कृषी आणि आयुर्वेदीक क्षेत्रात झपाट्याने नवीन बदल होत आहेत. या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान व होणाऱ्या बदलाची माहिती देण्यासाठी डोंबिवलीतील वनराई प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने कृषी, आयुर्वेद व नर्सरी प्रदशनाचे ऊद्घाटन करण्यात आले. 5 नोव्हेंबर या कालावधीत डोंबिवली पूर्वेकडील ह.भ.प. सावळाराम म्हात्रे महाराज क्रीडासंकुल येथे प्रदर्शन पहाण्याचा लाभ घेता येणार आहे.

तसेच यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा डोंबिवलीतील वाचकांसाठी मोठ्या प्रमाणात पुस्तक दालन जेथे वजनावर वाचनीय पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच 105 स्टॉल या महोत्सवात ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी फळभाज्या व फुलभाज्या कशा उगवतात याचेही धडे देण्यात येणार आहेत. बारा बलुतेदार यांच्याबद्दलही विशेष माहिती देणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनाही वनराईच्यावतीने मदत करण्यात येणार आहे. पारंपरिक शेती बरोबर बदलणाऱ्या शेती विषयक माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच यंदा ओला दुष्काळ पडला असल्याने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी देखील वनराई प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येणार आहे. या वर्षी शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी विशेष लक्ष देण्यात आलेआहे. याप्रसंगी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे, राजेश मोरे, महेश पाटील, विकास देसले आदि मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनासाठी बंडू पाटील, कृषी विभाग अधिकारी सूर्यकांत कांबळे, तात्यासाहेब माने, बबन पगारे यांनी मेहनत घेऊन निटनेटके आयोजन केले.