डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सूर असल्याने महिलांमध्ये घबराटीचे वातावरण झाले आहे. रस्त्यावरून चालताना महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा होण्याचे प्रकार होत असल्याने या भुरट्या चोरांना पोलिसांचा वचक नाही अशी चर्चा होते आहे.
कल्याण पश्चिम रामदासवाडी येथील जेष्ठ महिला मंगळवारी सकाळी 6.45 वाजता मॉर्निंग वॉक करता गेल्या असता मोटार सायकल क्रमांक MH05/BP31 वरील मागे बसलेल्या अनोळखी इसमाने जोरात थाप मारून त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची 25 हजार रुपये किमतीची चैन लंपास करून धूमस्टाईलने पोबारा केला. या घटनेची नोंद महात्मा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून एस.डी. डांबरे अधिक तपास करीत आहेत.