रिक्षा धडकेत दुचाकी स्वार गंभीर जखमी

डोंबिवली : पूर्वेकडील फडके वॉच सेंटर समोर रिक्षा चालकाने मोटार सायकल स्वाराला दिलेल्या जोरदार धडकेत मोटार सायकल स्वार गंभीर जखमी होऊन त्याच्या पायाचे हाड मोडल्याची घटना उघड झाली आहे.

याबाबत डोंबिवली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितनुसार पश्चिमकडील सुभाष रोडवरील यक्ष एन.क्ल्यू. सोसायटीत राहणारे सुनिल रमेश पिंपळकर (35) हे रविवारी दुपारी पेट्रोल भरून MH05/CG9301 मोटार सायकलवरून परत येत होते. दरम्यान पूर्वेकडील फडके वॉच सेंटर समोर रिक्षा क्रमांक MH05/CG7689 चालकाने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. या धडकीत मोटार सायकल स्वार पिंपळकर गंभीर जखमी होऊन त्याच्या पायाचे हाड मोडल्याने रिक्षा चालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत सहा.पो.उप.निरिक्षक डी.एल. भांगरे अधिक तपास करीत आहेत.