डोंबिवलीत रिपाईने केले अभिवादन

डोंबिवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरीनिर्वाण दिना निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन करण्यात आले.

शहरातील पूर्व-पश्चिम विभागातील आंबेडकरनगर, इंदिरानगर, राजूनगर, क्रांतीनगर, समतानगर, आयरेगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून “त्रिशरण आणि पंचशील” सामुहिकरित्या म्हणण्यात आले. यावेळी रिपाई शहरअध्यक्ष अंकुश गायकवाड, पदाधिकारी किशोर मगरे, तुकाराम पवार, राजू तुपे, दिलीप काकडे, सतीश पवार, विठ्ठल खेडकर, जया पांडा, कृष्णा रोकडे यांच्यासह आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. तर महापालिकातर्फे उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील बाबासाहेबांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.