संगीत महोत्सवाचे आयोजन

डोंबिवली : गणेश मंदिर संस्थान माध्यमातून अनेक वर्ष संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही तीन दिवसाचा संगीत महोत्सव होणार आहे. पूर्वेकडील आप्पा दातार चौकात सदर महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य असून संगीत रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थान तर्फे करणायत आले आहे.

शुक्रवार, दि. २९ डिसेंबर रोजी शास्त्रीय गायन व भक्तीसंगीत सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर आणि मंजुषा पाटील सादर करणार आहेत. शनिवार दि. ३० डिसेंबर रोजी जयतीर्थ मेवुंडी “मराठी संगीत मैफल बोला विठ्ठल” सादर करणार आहेत. तर रविवार, दि. ३१ डिसेंबर रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ सुहास काणे “अंटार्टिका एक आव्हान” या विषयावर भारतीय संशोधन केंद्रातील अनुभव सांगणार आहेत. हे सर्व कार्यक्रम सायंकाळी ७ ते रात्रो १० या वेळेत होणार आहेत.