डोंबिवली : मनसेचे नेते प्रमोद (राजू) पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण डोंबिवली शहर तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील अस्तित्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मनसे जिल्हा आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या आवारात सुरू असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देखील दिवसभराचे भोजन प्रायोजित करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष तथा गटनेते प्रकाश भोईर, जिल्हा संघटक राहुल कामत, जिल्हा सचिव प्रकाश माने, शहर अध्यक्ष मनोज घरत, शहर अध्यक्षा मंदाताई सुभाष पाटील, शहर सचिव अरुण जांभळे, संजीव ताम्हाणे, उपशहर अध्यक्ष दिपक शिंदे, उपविभाग अध्यक्ष विशाल बढे, मिहीर दवते, परभणी तालुका अध्यक्ष निलेश पुरी, महाराष्ट्र सैनिक हेमंत दाभोळकर, उपविभाग अध्यक्षा अंजना भोईर, महिला शाखा अध्यक्ष ज्योती खवसकर, मेधा चोरगे व पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे विनोद रतन पाटील यांच्या सहकार्याने अस्तित्व संस्थेला देणगी देण्यात आली. तसेच कल्याण शीळ रोडवर नव्याने उघडण्यात आलेल्या व प्रथितयश अशा नाहर या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिरासह सवलतीच्या दरामध्ये काही योजना राबविण्यात आल्या. पश्चिमकडील शास्त्रीनगर रुग्णालयातील रुग्णांना तसेच विष्णूनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फळवाटप, पूर्वेकडील जननी आशिष या अनाथालयातील मुलांना आवश्यक वस्तूंचे वाटप आणि देणगी स्वरूपात मदत करण्यात आली अशी माहिती शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी दिली.